शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

पदवीधर मतदार संघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

By admin | Updated: May 24, 2014 23:42 IST

भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांवर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात येत्या २0 जून रोजी नागपूर पदवीधर मतदार संघासह पाच मतदार संघात निवडणूक होणार आहे

गोंदिया : भारत निवडणूक आयोगाने विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या जागांवर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यात येत्या २0 जून रोजी नागपूर पदवीधर मतदार संघासह पाच मतदार संघात निवडणूक होणार आहे. २0 जून रोजी होणार्‍या या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जिल्ह्यातील १७ हजार ८१४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यासाठी एकूण २२ मतदान केंद्र राहणार असून येत्या ३ जून पर्यंंत नवीन पदवीधर मतदारांना नाव नोंदणी करता येणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी एस.एन.लोणकर यांनी दिली.

राज्यातील औरंगाबाद पदवीधर मतदार संघ, पुणे पदवीधर मतदार संघ, नागपूर विभाग पदवीधर मतदार संघ, अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ, पुणे विभाग शिक्षक मतदार संघ अशा एकूण पाच संघात विधान परिषदेच्या निवडणुकी संदर्भात निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. यातील नागपूर पदवीधर मतदार संघात गोंदिया जिल्ह्याचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १७ हजार ८१४ पदवीधर मतदार संख्या आहे. यात तिरोडात दोन हजार २९१, गोंदिया सहा हजार ६६, दवनीवाडा ५३७, आमगाव दोन हजार पाच, गोरेगाव एक हजार ५९९, सालेकसा ६५९, सडक अर्जुनी एक हजार ७५८, देवरी एक हजार आठ, नवेगावबांध ५१९ तर अर्जुनी मोरगावमध्ये एक हजार ५८३ मतदार आहेत. येत्या २0 जून रोजी होणार्‍या मतदानासाठी जिल्ह्यातील २२ केंद्रावर मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार असल्याची माहिती लोणकर यांनी दिली. याप्रसंगी गोंदिया व देवरीचे उप विभागीय अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)