हे सरकार शेतकऱ्यांना संपवायला निघाले आहे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 21:54 IST2018-03-31T21:54:25+5:302018-03-31T21:54:25+5:30
भाजपचा नारा सातबारा कोरा असे आश्वासन देणारे सरकार आता पूर्णत: कर्जात बुडालेले असून आॅनलाईन वर अटकलेले आहे. प्रत्येक कामासाठी आॅनलाईन आवश्यक केले.

हे सरकार शेतकऱ्यांना संपवायला निघाले आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
तिरोडा : भाजपचा नारा सातबारा कोरा असे आश्वासन देणारे सरकार आता पूर्णत: कर्जात बुडालेले असून आॅनलाईन वर अटकलेले आहे. प्रत्येक कामासाठी आॅनलाईन आवश्यक केले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ अजूनपर्यंत झालेले नाही. भंडारा-गोंदिया दोन्ही जिल्ह्यात निबंधकांना विचारण्यात आले तेव्हा अजुनपर्यंत कर्जमाफीची पूर्ण यादी आलेली नसल्याचे ते सांगतात. महागाई वाढली असून शेतमालाच्या किमती घसरलेल्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांना संपवायला निघाले असल्याचे प्रतिपादन माजी खासदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
येथील श्रीमती अंजनाबाई झरारीया सभागृहात आयोजित तालुकास्तरीय बुथ समन्वयक मेळावा व सत्कार समारंभात ते बोलत होते. या वेळी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष शिशुपाल पटले, डॉ. योगेंद्र भगत, डॉ. नामदेव किरसान, जिल्हा काँग्रेस कमिटीचे महासचिव पी.जी. कटरे, प्रदेश प्रतिनिधी अमर वऱ्हाडे, अॅड. के.आर. शेंडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राधेलाल पटले, शहर अध्यक्ष लक्ष्मीनारायण दुबे, सखी मंच संयोजिका ममता दुबे, मातृसेवा संघटनेच्या अध्यक्ष वनिता ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना पटोले यांनी, १५ दिवसानंतर आणखी एक मोठा कार्यक्रम घेण्यात येईल. तेथे मात्र जनसमुदाय मोठा असेल. आता कामाला लागा, अन्यथा नवीन भर्ती करावी लागेल. कागदावर काम नको प्रत्यक्ष काम पाहिजे असेही सांगितले. या कार्यक्रमात माजी खासदार पटोले यांचा आयोजक, व मातृसेवा संघाच्यावतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान उपस्थित अन्य पदाधिकाºयांनीही या वेळी मार्गदर्शन केले.
संचालन माणिक झंझाड यांनी केले. आभार माजी पं.स. सदस्य पटले यांनी मानले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष पटले यांनी मांडले. कार्यक्रमासाठी अनुसूचित जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष हितेंद्र जांभुळकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेल गोंदिया जिल्ह्याचे अध्यक्ष डी.आर. गिरीपुंजे, हुपराज जमईवार, कमल कापसे, धनराज पटले, रामलाल रहांगडाले, दिलीप ढाले, छाया मडावी, रुबुना मोतीवाला, ओमप्रकाश पटले यांनी े सहकार्य केले.