शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

सरकार बदलले, धान खरेदी ‘जैसे थे’

By admin | Updated: December 18, 2015 02:20 IST

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने दरवर्षी विविध धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केली जाते.

८० टक्के धान उघड्यावरच : मुख्यमंत्र्यांचे आश्वासन अपूर्णचगोंदिया : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने दरवर्षी विविध धान खरेदी केंद्रांवरून धान खरेदी केली जाते. मात्र गोदामांची सोय नसल्यामुळे ७० ते ८० टक्के धान उघड्यावरच ठेवण्यात येतो. धानाची लवकर मिलिंग झाली नाही तर तो धान पाखड होतो. गेल्यावर्षीच्या धानातून ४० ते ५० हजार क्विंटल धान पाखड झाल्याचे सूत्रांनी सांगितले. यावर्षी पुन्हा आदिवासी विकास महामंडळाचा धान उघड्यावर राहणार असल्यामुळे पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.मागील वर्षी आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने जिल्ह्यात पाच लाख ८० हजार क्विंटल धान खरेदी करण्यात आला. यापैकी काही धान गोदामात, तर काही धान ओट्यांवर आणि ७० ते ८० टक्के धान उघड्यावरच ठेवण्यात आला. यापैकी ९४ ते ९५ टक्के धानाची मिलिंग करण्यात यंत्रणेला यश आले. मात्र ४० ते ५० हजार क्विंटल धान शिल्लक आहे. हा शिल्लक धानाचा साठा आता पाखड झाला आहे. त्यातच किती धान उघड्यावर ठेवण्यात आल्याने सडला, याची माहिती घेणे सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. शासनाच्या वतीने धान साठविण्यासाठी गोदामांची अपुरी व्यवस्था आहे. गोदामांसाठी जागा शोधणे, फॉरेस्ट विभागाची परवानगी घेणे आदी प्रक्रिया सद्यस्थितीत सुरू आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने गोदामांचे काम पुढील पावसाळ्यापर्यंत पूर्णत्वास जाईल किंवा नाही, याबाबत संशय निर्माण होत आहे. आदिवासी महामंडळाच्या परिसरातील धान खरेदी केंद्रांवर धान साठविण्याची सोय आहे. मात्र ही सोय पुरेसी नसल्याने ओट्यांवर धान साठविला जातो. त्यावर ताडपत्री घालून सुरक्षा केली जाते. तरीही धान दरवर्षीच पाखड होतो किंवा सडते.