शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

गोंदियातील प्रवाशांना खुशखबर ! इंदूरनंतर, दिल्ली विमानसेवा लवकरच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 20:26 IST

विमानसेवेला प्रतिसाद : १६ सप्टेंबरपासून गोंदियाहून बेंगलुरूलाही घेता येणार उड्डाण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील बिरसी येथील विमानतळावरून सध्या इंडिगोची गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती ही विमानसेवा सुरू आहे. यानंतर १६ सप्टेंबरपासून गोंदिया-इंदूर-बेंगळुरू या मार्गावर प्रवासी विमानसेवेला प्रारंभ होणार आहे. तर गोंदिया-दिल्ली प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनी अनुकूलता दर्शविली आहे. त्यामुळे या मार्गावर लवकरच गोंदियाहून प्रवासी विमान सेवेला प्रारंभ होणार असून ही निश्चित जिल्हावासीयांसाठी दिलासादायक बाब आहे.

गोंदिया तालुक्यातील बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ तत्कालीन केंद्रीय विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने उभारण्यात आले. यानंतर सन २०२२ मध्ये फ्लाय बिग या कंपनीने गोंदिया-इंदूर या प्रवासी विमान वाहतूक सेवेला सुरुवात केली होती. याला प्रवाशांचासुद्धा चांगला प्रतिसाद मिळाला होता. पण काही तांत्रिक अडचणीमुळे ही सेवा वर्षभराच्या आतच बंद झाली. यानंतर गेल्या वर्षीपासून इंडिगो विमान विमानतळावरून गोंदिया-हैद्राबाद-तिरुपती या मार्गावर कंपनीने बिरसी विमानसेवा सुरू केली. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानंतर आता स्टार एअर कंपनीने या विमानतळावरून गोंदिया-इंदूर-बेंगळुरू या मार्गावर १६ सप्टेंबरपासून प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे वेळापत्रकसुद्धा कंपनीने जाहीर केले आहे. पूर्वी केवळ गोंदिया-इंदूर विमानसेवा सुरू करण्यात येणार होती. पण स्टार एअर कंपनीने आता गोंदिया-इंदूर-बेंगळुरू या मार्गावर सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोंदिया-दिल्ली विमानसेवेसाठी बालघाटच्या खासदारांचा पुढाकार

  • गोंदिया जिल्ह्याला मध्यप्रदेश आणि छत्तीसगड राज्याची सीमा लागून आहे. या दोन्ही राज्यातील प्रवाशांसाठी गोंदिया येथील विमानतळ सोयीस्कर आहे.
  • त्यामुळे गोंदिया-दिल्ली या २ मार्गावर प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी बालाघाटच्या खा. भारती पारधी यांनी पुढाकार घेत केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले.
  • यावर केंद्रीय विमान वाहतूक मंत्र्यांनीसुद्धा अनुकूलता दर्शविल्याची माहिती आहे. त्यामुळे लवकरच थेट गोंदियाहून दिल्लीला उड्डाण घेणे शक्य होणार असून यामुळे उद्योगाला चालना मिळण्यास मदत होईल.

असे आहे वेळापत्रक

बेंगळुरूहून दुपारी २:३० वाजता विमान इंदूरसाठी उड्डाण घेईल व सायंकाळी ४:३० वाजता इंदूरला पोहोचेल. इंदूरहून सायंकाळी ५ वाजता गोंदियासाठी उड्डाण भरेल आणि गोंदियाला सायंकाळी ५:५५ वाजता पोहोचेल. तर गोंदियाहून सायंकाळी ६:२५ वाजता इंदूरसाठी उड्डाण भरेल व सायंकाळी ७:२० वाजता इंदूरला पोहोचेल व सायंकाळी ७:५० वाजता बेंगळुरूसाठी उड्डाण भरेल व रात्री ९:४५ वाजता बेंगळुरूला पोहोचेल.

टॅग्स :airplaneविमानAirportविमानतळ