शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियावासीयांना लागली सलमानला पाहण्याची उत्सुकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2016 01:29 IST

शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त गोंदियात आयोजित शानदान समारंभात ...

मनोहरभाई पटेल जयंती : आज विद्यार्थ्यांचा सुवर्णपदकांनी गौरवगोंदिया : शिक्षणमहर्षी मनोहरभाई पटेल यांच्या ११० व्या जयंतीनिमित्त गोंदियात आयोजित शानदान समारंभात मंगळवारी (दि.९) विविध शाखेच्या १४ गुणवंत विद्यार्थ्यांना मनोहरभाई पटेल स्मृती सुवर्णपदकांनी गौरविले जाणार आहे. या कार्यक्रमाचे आकर्षण प्रसिद्ध सिने अभिनेता सलमान खान असून त्याला पाहण्यासाठी गोंदियावासीयांसोबत लगतच्या जिल्ह्यातील युवा वर्गाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.गेल्या २५ वर्षांपासून युवा वर्गाच्या हृदयावर राज करणाऱ्या सलमानला प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळणार असल्यामुळे वर्गा वर्गात कमालीचा उत्साह दिसून येत आहे. मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विस्तीर्ण प्रांगणात दुपारी १२.३० वाजता होणाऱ्या या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी खा. प्रफुल्ल पटेल राहणार आहेत. तसेच प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार रजत शर्मा, मीडिया गुरू सुहेल सेठ, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अनिल देशमुख प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. गुजराती राष्ट्रीय केलवणी मंडळ, स्व.मनोहरभाई पटेल स्मृती समिती तथा मनोहरभाई पटेल अ‍ॅकेडमीच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. गेल्यावर्षी सुप्रसिद्ध क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडूलकरच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्याना गौरवित केले होते तर त्याआधी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव झाला होता. विशेष म्हणजे यापूर्वी २००९ च्या निवडणूक प्रचारादरम्यान खा.प्रफुल्ल पटेल यांच्या प्रचारासाठी खास सलमान मुंबईवरून गोंदियात आला होता. त्यामुळे पुन्हा एकदा सलमानला पाहण्याची संधी गोंदियावासीयांना मिळेल. या कार्यक्रमात नागरिकांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन गोंदिया शिक्षण संस्थेचे सचिव आ.राजेंद्र जैन, माजी आ.हरिहरभाई पटेल यांनी केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)