शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

गोंदियावासीयांनाही आता पाण्याच्या टँकरचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2016 01:27 IST

गोंदिया शहरात आता एकच वेळ सकाळी नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुरेसे पाणी मिळण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत आहे.

टँकरने पाणीपुरवठा : मध्यवस्तीला दिलासागोंदिया : गोंदिया शहरात आता एकच वेळ सकाळी नळाद्वारे पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुरेसे पाणी मिळण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड उडत आहे. पण त्यातूनही पाणी मिळत नसल्यामुळे आता शहराच्या काही भागात नगर परिषद टँकरने पाणी पुरवठा करीत आहे. यामुळे बऱ्याच प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे.विशेष म्हणजे शहरात एकच वेळ पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर टिल्लू मोटारी लावून पाणी खेचण्याचे प्रकार वाढले होते. त्यामुळे बऱ्याच लोकांना पाणी मिळणे कठीण झाले होते. ‘लोकमत’ने ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाच्या सूचनेवरून गोंदियासह तिरोडा शहरात नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या वेळेस वीज पुरवठा खंडित ठेवणे सुरू झाले आहे. तरीही काही भागात पाणी पोहोचतच नाही. सिव्हील लाईनमध्ये नगरसेविका भावना कदम यांनी टँकरची सुविधा उपलब्ध केली आहे. ‘लोकमत’चा उपक्रम स्तुत्य व महत्त्वाचापाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे आता गरजेचे आहे आहे. कधी नव्हे इतकी पाण्याची झळ यावर्षी सर्वांना सहन करावी लागत आहे. ही झळ सहन केल्याशिवाय पाण्याचे महत्व कोणाला समजलेही नसते. आतातरी लोकांमध्ये जागृती येणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘लोकमत’ समुहाने सुरू केलेला जलमित्र हा उपक्रम अतिशय मोलाचा आहे. विशेषत: स्लम एरियात ही जनजागृती जास्त गरजेची आहे. त्या भागात अनधिकृत नळ कनेक्शन आहेत. त्यातून पाणी वाहून जाते पण कोणाला काळजी नसते. घराच्या छतावरील, इमारतींवरील पावसाचे पाणी विहिरीत, बोअरवेलमध्ये फिल्टर करून टाकावे लागणार आहे, अशी भावना जीवन प्राधीकरणचे उपकार्यकारी अभियंता राजेंद्र मडके यांनी व्यक्त केली.