गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 06:00 AM2019-11-20T06:00:00+5:302019-11-20T06:00:21+5:30

गोंदिया जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ जून २०२० मध्ये पूर्ण होत आहे.त्यापूर्वी जि.प.च्या निवडणुका होणे निश्चित आहे. मागील पाच वर्ष जि.प.अध्यक्षपद अनुसूचित जमाती (महिला) साठी राखीव होते. तर मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीत पुढील पाच वर्षांसाठी जि.प.अध्यक्षपदाच्या सोडतीत जि.प.अध्यक्षपद सर्वसाधारण झाले आहे.

Gondia Zilla Parishad Presidency Opened | गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले

गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले

Next
ठळक मुद्देनिवडणुकीत वाढणार चुरस : आजी माजी सदस्य झाले सक्रिय, इच्छुकही लागले कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्यभरातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाची आरक्षण सोडत मंगळवारी (दि.१९) मुंबई येथे काढण्यात आली. या सोडतीकडे अख्या राज्याचे लक्ष लागले होते. यावेळी काढण्यात आलेल्या सोडतीत गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे खुले(सर्वसाधारण) झाले आहे.त्यामुळे सहा महिन्यांनी होणाऱ्या जि.प.च्या निवडणुकीत चूरस पाहयला मिळणार आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाळ जून २०२० मध्ये पूर्ण होत आहे.त्यापूर्वी जि.प.च्या निवडणुका होणे निश्चित आहे. मागील पाच वर्ष जि.प.अध्यक्षपद अनुसूचित जमाती (महिला) साठी राखीव होते. तर मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीत पुढील पाच वर्षांसाठी जि.प.अध्यक्षपदाच्या सोडतीत जि.प.अध्यक्षपद सर्वसाधारण झाले आहे.त्यामुळे कोणत्याही प्रवर्गाच्या सदस्याला अध्यक्ष बनण्याची संधी आहे. त्यामुळे सहा महिन्यांनी होणाºया जि.प.च्या निवडणुकीत दिग्गज उमेदवार रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.यामुळे या निवडणुकीत चूरस पाहयला मिळू शकते.भंडारा-गोंदिया जिल्ह्याचे विभाजन होऊन १ मे १९९९ मध्ये गोंदिया जिल्हा परिषदेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर म्हणजे मागील १९ वर्षांच्या कालावधीत एकदा जि.प.अध्यक्षपद सर्वसाधारण झाले होते. त्यानंतर मंगळवारी काढण्यात आलेल्या सोडतीत दुसऱ्यांदा गोंदिया जि.प.चे अध्यक्षपद हे सर्वसाधारण झाले आहे. गोंदिया जि.प.एकूण ५३ सदस्यीय असून मागील साडेचार वर्षांपासून काँग्रेस-भाजप अभद्र युतीची सत्ता आहे.
तर पक्षीय बलाबल पाहिले असता राष्ट्रवादी काँग्रेस २०,काँग्रेस १६ आणि भाजपचे १७ सदस्य आहेत. विद्यमान पदाधिकारी आणि सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल जून २०२० मध्ये संपुष्टात येत आहे.त्यामुळे यासाठी निवडणुका होणार असून त्या दृष्टीकोनातून सर्वच राजकीय पक्ष आणि निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी तयारी सुरू केल्याचे चित्र आहे.तर आता अध्यक्षपद खुले झाले असल्याने कोणत्याही प्रवर्गाच्या सदस्याला अध्यक्ष होता येणार आहे.त्यामुळे अध्यक्षपद आरुढ होण्यासाठी अनेकांच्या इच्छा पल्लवीत झाल्या असून बहुमताचा आकडा गाठून आपल्या पक्षाची सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांमध्ये सुध्दा चढाओढ पाहयला मिळणार आहे. याकडे नजरा लागल्या आहे.

कार्यक्रमातून जनसंपर्क वाढविण्यावर भर
सहा महिन्यांनी जि.प.ची निवडणूक होऊ घातली आहे. ती लक्षात घेऊन आजी माजी जि.प.सदस्य आणि निवडणूक लढवू इच्छिणाºया उमेदवारांनी आपआपल्या जि.प.क्षेत्रात जनसंर्पक वाढविण्यावर भर दिला आहे. सध्या गावांगावामध्ये मंडई उत्सव सुरू असून या माध्यमातून ईच्छुकांनी मतदारांसह संर्पक साधण्यास सुरूवात केली असल्याचे चित्र आहे.
दिग्गज उतरणार मैदानात
जि.प.चे अध्यक्षपद हे सोडतीत खुले झाले असल्याने सर्वच प्रवर्गाच्या उमेदवारांना अध्यक्षपदी आरुढ होता येणारआहे. त्यामुळे जि.प.च्या निवडणुकीत अनेक दिग्गज उमेदवारांनी निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे.त्यासाठी काहींनी तयारी सुध्दा केली आहे.
सर्व राजकीय पक्ष लागले तयारीला
अलीकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वच राजकीय पक्ष सहा महिन्यांनी होऊ घातलेली जि.प.ची निवडणूक लक्षात घेऊन त्यादृष्टीने कामाला सुरूवात केली आहे.निवडणूक लढवू इच्छिणाºया उमेदवारांची चाचपणी आणि जि.प.आणि पं.स.क्षेत्रनिहाय बैठका घेण्यास राजकीय पक्षांनी सुरूवात केली आहे.

Web Title: Gondia Zilla Parishad Presidency Opened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.