शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

Gondia: तुझी-माझी जोडी सगळ्यांत न्यारी, नोंदणी करणारी, ५९९ जोडप्यांनी केली विवाह नोंदणी

By कपिल केकत | Updated: January 18, 2024 21:49 IST

Gondia News: विवाहात होणारा अवाढव्य खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने विवाह आटोपून घेण्याचा नवा ट्रेंड सध्या आजच्या पिढीत वाढताना दिसत आहे. नातेवाईक व काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह आटोपून घेण्याची पद्धती वाढत चालली आहे.

- कपिल केकतगोंदिया - विवाहात होणारा अवाढव्य खर्च न करता अगदी साध्या पद्धतीने विवाह आटोपून घेण्याचा नवा ट्रेंड सध्या आजच्या पिढीत वाढताना दिसत आहे. नातेवाईक व काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह आटोपून घेण्याची पद्धती वाढत चालली असून, त्यानंतर ही लग्नगाठ अधिक मजबूत करण्यासाठी ते विवाह नोंदणीवर जास्त भर देत आहेत. हेच कारण आहे की, विवाह नोंदणीचा आकडा वाढताना दिसत आहे.

‘घर म्हणते बांधून बघ व विवाह म्हणते करून बघ’ अशी म्हण प्रचलित असून, घरात जेवढा पैसा लावला तेवढा कमीच असतो व विवाहावरही जेवढा पैसा लावला तेवढा कमीच असतो, असा याचा अर्थ आहे. ही म्हण वास्तविकतेला जुळणारी असून, कित्येक विवाह जीवनात एकदाच होत असल्याने धूमधडाक्यात करण्यासाठी लाखो रुपये ओततात. विवाहावर जेवढा पैसा खर्च करा तेवढा कमीच असल्याने पैशांची उधळण करण्यापेक्षा तेवढा पैसा वर-वधूंना भविष्यासाठी देणे जास्त फायद्याचे असते. नेमकी हीच धारणा आजच्या पिढीत निर्माण झाली आहे. यातूनच आजची पिढी अत्यंत साध्या पद्धतीने विवाह आटोपून घेण्यावर भर देतात. दोन्ही बाजूंचे नातेवाईक व काही मित्रमंडळींच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडतो व असे कित्येक विवाह आता बघावयास मिळत आहेत.

विशेष म्हणजे, साध्या पद्धतीने विवाह आटोपून घेतल्यानंतर मात्र आजची पिढी आपल्या विवाह बंधनाला अधिक घट्ट करण्यासाठी न विसरता विवाह नोंदणी करीत आहे. हेच कारण आहे की, कधी काळी विवाह होऊन कित्येक वर्षे लोटल्यानंतरही विवाहाची नोंदणी केली नव्हती. आता मात्र विवाह होताच विवाह नोंदणी केली जात असून, यामुळेच विवाह नोंदणीचा आकडा वाढताना दिसत आहे. नगर परिषद विवाह नोंदणी कार्यालयात सन २०२२ मध्ये ५३७ विवाह नोंदणी करण्यात आले आहेत. तर सन २०२३ मध्ये त्यात वाढ झाली असून, ५९९ विवाह नोंद करण्यात आल्याची नोंद आहे. म्हणजेच, विवाह नोंदणी करण्याकडे आजच्या पिढीचा कल वाढताना दिसत आहे.

विवाह नोंदणीबाबत जनजागृतीची गरज- दरवर्षी जिल्ह्यात हजारोंच्या घरात विवाह सोहळे पार पडतात. मात्र, झालेल्या विवाहांची नोंदणी मात्र शेकड्यातच दिसून येते. यामागचे कारण म्हणजे, आजही कित्येकांना विवाह नोंदणी करण्याची गरज काय आहे, याबाबत माहिती नाही. आजच्या पिढीत बहुतांश वर-वधू दोघेही नोकरी करणारे असल्याने पुढे जाऊन त्यांना विवाह नोंदणी प्रमाणपत्राची गरज पडते व त्यासाठी ते विवाह नोंदणी करवून घेतात. याबाबत सर्वसामान्यांनाही माहिती मिळावी, यासाठी विवाह नोंदणीबाबत जनजागृतीची गरज आहे.

 नोंदणीसाठी लागणार ही कागदपत्रे- शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधारकार्ड, रेशनकार्ड, नगरसेवकाचे प्रमाणपत्र, वर-वधूचे पासपोर्ट आकाराचे ३ फोटो, विवाह पत्रिका, पंडित किंवा विवाह करवून देणाऱ्या संस्थेचे प्रमाणपत्र, कोर्ट तिकीट, सुरू वर्षाची घर कर पावती, तीन साक्षीदार व त्यांचे आधारकार्ड, रेशनकार्ड व प्रत्येकी एक पासपोर्ट फोटो. या सर्व कागदपत्रांची झेरॉक्स व ती प्रमाणित केलेली असावी.

२०२२ व २०२३ मध्ये नोंदणी झालेले विवाह

महिना- २०२२- २०२३जानेवारी- २३-२३फेब्रुवारी-४२-१८मार्च- ५९-५१एप्रिल- ४९- ६१मे- ४३- ५९जून- ७२-८७जुलै- ५६-८३ऑगस्ट- ४३-५३सप्टेंबर- ३७-५३ऑक्टोबर- १७-३९नोव्हेंबर- ४८-३१डिसेंबर- ४८- ५०एकूण- ५३७- ५९९

टॅग्स :marriageलग्न