शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

शाळा सिद्धीत गोंदिया राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 6:00 AM

शालेय स्तरावर शिक्षणाची मानके सुधारण्याचा या उपक्रमातून प्रयत्न आहे. गुजरात सरकारचा गुणोत्सव, ओरिसा सरकारचा समिक्षा, कर्नाटक सरकारने विकसित केलेल्या शालेय गुणवत्ता व प्रामाणिकपणे आराखडा, महाराष्ट्र राज्याचे माझी समृद्ध शाळा, शाळा ग्रेडेशन इत्यादी सारख्या प्रचलित शाळा मुल्यांकनांच्या बलस्थानांचा अभ्यास करुन शाळासिद्धी हा राष्ट्रीय कार्यक्रम केंद्र शासनाने जाहीर केला आहे.

ठळक मुद्देवर्धा दुसऱ्या स्थानी तर नागपूर सर्वात मागे : विद्यार्थ्यांच्या प्रगतीला प्राधान्य, शिक्षण विभागाचा उपक्रम

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शैक्षणीक व भौतीक दृष्टीकोणातून प्रत्येक शाळा शंभर टक्के समृध्द व्हावी यासाठी शासनाने शाळा सिध्दी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात महाराष्ट्रात गोंदिया पहिल्या क्रमांकावर आहे. गोंदिया जिल्ह्यातील १६४२ शाळांपैकी १६१७ शाळांनी स्वयंमुल्यमापन केले आहे. १३ शाळांची कामे प्रगतीपथावर आहेत. तर १२ शाळांचे कामच सुरू झाले नाही. ९८.४८ टक्के शाळांनी स्वयंमुल्यमापन करून शाळा सिध्दीत गोंदिया जिल्हा पहिल्या क्रमांकावर आहे.शालेय स्तरावर शिक्षणाची मानके सुधारण्याचा या उपक्रमातून प्रयत्न आहे. गुजरात सरकारचा गुणोत्सव, ओरिसा सरकारचा समिक्षा, कर्नाटक सरकारने विकसित केलेल्या शालेय गुणवत्ता व प्रामाणिकपणे आराखडा, महाराष्ट्र राज्याचे माझी समृद्ध शाळा, शाळा ग्रेडेशन इत्यादी सारख्या प्रचलित शाळा मुल्यांकनांच्या बलस्थानांचा अभ्यास करुन शाळासिद्धी हा राष्ट्रीय कार्यक्रम केंद्र शासनाने जाहीर केला आहे. शाळा मुल्यांकना संदर्भातील विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संशोधनांचा विचार सदर मानके व मुल्यांकन आराखडा बनविताना करण्यात आला आहे. शाळा सिद्धी संदर्भातील सर्व माहिती स्कूल एव्युलेसन या डॅसबोर्ड वर उपलब्ध आहे. राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमामध्ये अध्ययन निष्पत्ती सोबत प्रक्रियेचा देखील पाठपुरावा केला जात आहे. वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि संख्यांवरील क्रियांच्या क्षमतांची संपादणूक, प्रभूत्व पातळीकडे जाण्यासाठी आवश्यक आहेत. या प्रक्रिया विचारात घेवून राज्यातील सर्व मुले प्रगत होण्याच्या दृष्टीने सर्व समावेशक कार्य केले जात आहेत. यामध्ये वर्षभरात तीन मुल्यमापन चाचण्यांचे आयोजन, शिक्षकस्नेही प्रशासकीय वातावरण, शिक्षकांच्या मागणीनुसार प्रशिक्षण, मूलनिहाय कृती आराखडा, इत्यादी बाबींचा समावेश आहे. सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा अधिकार शिक्षण हक्क कायद्याने प्राप्त झाला आहे. सर्व मुले शिकू शकतात. १५० पेक्षा अधिक मुलांच्या शाळांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने विद्यार्थी समयोजनातून समृद्ध शाळा ही संकल्पना राबविण्याचा शासनाचा मानस आहे. या सर्व बाबींचा विचार करता राज्यातील १०० टक्के शाळा या समृद्ध शाळा तयार करण्याची संकल्पना पुढे आली. शाळांमध्ये ज्ञान रचनावाद सार्थ ठरला आहे. याच धर्तीवर राज्यातील शाळांमध्ये मुले शिकविण्याचे काम सुरू आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या माध्यमातून सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आशादायी वातावरण निर्माण केले आहे.राज्यातील ७७८ शाळा आयएसओशाळा समृध्द करण्याच्या हेतूने शाळेत राबविण्यात येणारे उपक्रम, गुणवत्तापूर्ण शिक्षण व भौतिक सुविधा उत्कृष्ट केल्या जात असल्यामुळे महाराष्ट्रातील ७७८ शाळा आयएसओ प्रमाणीत आहेत. त्यात गोंदिया जिल्ह्याची एकच शाळा आहे. जिल्ह्यातील आयएसओ शाळांची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.स्वयंमूल्यमापनात गोंदिया पुढेशाळा सिध्दी स्वयंमुल्यमापनात गोंदिया जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. तर नागपूर सर्वात मागे आहे. वर्धातील ९८.२६ टक्के शाळांनी मुल्यमापन करून राज्यात दुसºया क्रमांकावर, त्यानंतर अकोला, रत्नागीरी, सांगली, भंडारा, सातारा, हिंगोली, बुलढाणा, कोल्हापूर, वाशिम, नाशिक, चंद्रपूर, सोलापूर, जळगाव, नंदुरबार, मुंबई दोन, अमरावती, परभणी, मुंबई (सुबुरबन), पालघर, लातूर, नांदेड, रायगड, जालना, अहमदनगर, सिंधुदुर्ग, यवतमाळ, पुणे, गडचिरोली, बीड, उस्मानाबाद, धुळे, ठाणे, औरंगाबाद व नागपूर अशी क्रमाक्रमाने उतरत्या क्रमाने हे जिल्हे शाळा सिध्दीच्या स्वयंमुल्यांकणात आहेत.१४ हजार शाळांची सुरूवातच नाहीशाळा सिध्दी उपक्रमात आपापल्या शाळेची माहिती अपलोड करून त्या दिशेने कामाला सुरूवात करायची होती. परंतु राज्यातील १४ हजार २०३ शाळांनी शाळा सिध्दीला सुरूवातच केली नाही.यात नागपूर जिल्ह्यातील १६०९ शाळा आहेत.

टॅग्स :Schoolशाळा