संतापजनक! गोंदियामध्ये 'आय लव्ह' पाकिस्तान लिहिलेल्या फुग्यांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 18:05 IST2017-09-27T16:44:00+5:302017-09-27T18:05:55+5:30
गोंदिया शहराच्या गांधी चौकात दुर्गा उत्सवा दरम्यान पाकिस्तनावर प्रेम करणारे फुगे लहान मुलांच्या हातात पाहायला मिळाल्याने ते फुगे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले.

संतापजनक! गोंदियामध्ये 'आय लव्ह' पाकिस्तान लिहिलेल्या फुग्यांची विक्री
गोंदिया - गोंदिया शहराच्या गांधी चौकात दुर्गा उत्सवा दरम्यान पाकिस्तनावर प्रेम करणारे फुगे लहान मुलांच्या हातात पाहायला मिळाल्याने ते फुगे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन केले. नवदुर्गोत्सवात जातीय तेढ निर्माण करण्यासाठी काही समाज कंठकांनी
चिमुकल्यांच्या हातात ‘पाकिस्तान आय लव्ह यु’ ‘पाकीस्तान जिंदाबाद’ असे लिहलेले फुगे आढळले. ते फुगे जप्त करण्यात आले. या संदर्भात तीन व्यापा-याकडून एक हजाराच्या संख्येत असलेले फुगे ही गोंदिया शहर पोलिसांनी मागवून ते फुगे तपासले. हे फुगे मुंबईच्या मिर्ची बाजार
परिसरातून फुटपाथवरुन खरेदी करण्यात आल्याचे व्यापा-यांनी सांगितले. गोंदिया शहरातील दुर्गा देवीचे दर्शन करण्यासाठी येणाºया चिमुकल्यांनी फुगे विक्रेत्याकडून फुगे खरेदी केले. त्या फुग्यांवर आई लव्ह यू पाकिस्तान असे लिहले असल्यामुळे ते फुगे युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी पकडून गोंदिया शहरातील पोलिसांच्या स्वाधिन केले. गोंदियातील फुगे व्यापारी वकील बैलानी, दौलत मेघानी आणि हजरत छोटलानी यांना बोलावून त्यांच्याकडील फुगे तपासून पाहावे. फुग्यावर कुठला लोगो आहे किंवा अशा पद्धतीचे फुगे विक्री तर होत नाही याची चौकशी केली. अशा प्रकारचे फुगे विक्री करतांनी आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
नागरिकांनी शांतता राखावी, असल्याप्रकारचे कसलेही फुगे विकू नये. सदर फुगे विक्री करताना नागरिकांना दिसले तर गोंदिया शहर पोलिसात माहिती दयावी.
मनोहर दाभाडे
पोलीस निरीक्षक, गोंदिया शहर