शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यात आले २२१ विदेशी प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 10:55 IST

गोंदिया जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि.२८) २२१ प्रवासी विविध देशातून प्रवास करून जिल्ह्यात आलेले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे६३६ जणांचे अलगीकरण कोरोनाचा प्रादुर्भाव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात शनिवारपर्यंत (दि.२८) २२१ प्रवासी विविध देशातून प्रवास करून जिल्ह्यात आलेले आहेत. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून विदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींची आणि त्यांच्या संपर्कांत आलेल्या व्यक्तीची आरोग्य तपासणी करून त्यांचे अलगीकरण व विलगीकरण करण्यात येत आहे. विदेशी प्रवास करून आलेल्या २२१ व्यक्तींच्या संपर्कात ९९५ व्यक्ती आढळून आल्यामुळे या व्यक्तींचे वास्तव्याच्या ठिकाणी अलगीकरण करण्यात आले होते.त्यापैकी ९८ विदेश प्रवास करून आलेल्या व्यक्तींचा व त्यांच्या संपकार्तील ३५९ व्यक्तींचा चौदा दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी संपलेला आहे. शनिवारपर्यंत विदेशातून आलेल्या १२३ प्रवासी व्यक्ती व त्यांच्या संपर्कात आलेल्या ६३६ व्यक्ती अलगीकरणामध्ये त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी आहेत. हे सर्व व्यक्ती प्रशासनाच्या देखरेखीखाली आहेत. १३ व्यक्ती विलगीकरणामध्ये आणि ८ व्यक्तींना शासकीय अलगीकरण केंद्रामध्ये ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या अनुषंगाने १४ नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून १२ नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. एक नमुना पॉझिटिव्ह आलेला आहे तर दोन नमुन्याचा अहवाल अप्राप्त असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक गोंदिया यांनी दिली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस