शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांना कर्जमाफी द्या

By admin | Updated: January 31, 2016 02:04 IST

तालुक्यातील धोप व ताडगाव परिसरातील शेतकऱ्यांना या वर्षी पीक झाले नसल्याने व या दोन्ही गावांची आणेवारी २९ पैसे निघाली ...

तहसीलदारांना निवेदन : धोप, ताडगावासीयांची मागणीमोहाडी : तालुक्यातील धोप व ताडगाव परिसरातील शेतकऱ्यांना या वर्षी पीक झाले नसल्याने व या दोन्ही गावांची आणेवारी २९ पैसे निघाली असल्याने येथील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, तसेच सोरणा तलावात बावनथडी प्रकल्पाचा पाणी सोडण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत धोप व ग्रामवासी यांनी तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.धोप व ताडगाव जवळील सोरणा तलावात फक्त २० टक्के जलसाठा उपलब्ध होता. पाऊस न आल्यामुळे तसेच तलावात पाणी नसल्याने या दोन्ही गावातील शेतकऱ्यावंर नापिकीची पाळी आली. तसेच ज्यांचे थोडेफार पीक झाले होते त्यांचा किडीच्या प्रादुर्भावाने पूर्ण तनसीत रूपांतर झाले. अशा परिस्थितीत जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाच्या सर्व्हेक्षणाद्वारे या दोन्ही गावांची आणेवारी २० पैसे काढण्यात आली असून या दोन्ही गावांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना पुर्ण कर्जमाफी देण्यात यावी, विज बिल माफ करण्यात यावे, नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच अशी परिस्थिती पुन्हा शेतकऱ्यावर येवू नये, यासाठी बावनथडी प्रकल्पाचा एक कालवा सोरणा तलावात जोडण्यात यावा व सोरणा तलावाची साठवण क्षमता वृद्धी करावी अशा मागण्या करण्यात आल्या असून मागण्या पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून रास्ता रोको करण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देताना सरपंच मंगला पिकलमुंडे, कृष्णा पिंगरे, वर्षा नागलवाडे, केवलचंद कांबळे, नरेंद्र पिकलमुंडे, किरण अतकरी, प्रभु मोहतुरे, अरुण तितीरमारे, श्याम कांबळे, केशव बांते, चंगेज खान, दिलीप ढोसरे, गणेश पाटील, केवल कांबळे, निलकंठ गिरीपुंजे, राजेश शेंडे, संजय पाटील, रवि सपाटे, मणिराम निमकर, पुरूषोत्तम शेंडे, उरकुडा राखडे, गुड्डू बांते, संतोष उके, दुर्गा सपाटे, शारदा भोयर आदी गावकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)