शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या बालकांचे लसीकरण करवून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 06:00 IST

गोंदिया जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष २.० अंतर्गत ० ते २ वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या तसेच वीट भट्टयामधील, स्थलांतरीत झालेले लोक, मजूरवस्ती इत्यादी ठिकाणच्या २ वर्षांतील बालकांचा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत शोध घेवून त्यांना संपूर्ण लसीकरण करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । कादंबरी बलकवडे, मिशन इंद्रधनुष लसीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मिशन इंद्रधनुष २.० लसीकरण मोहिमेची तिसरी फेरी आता राबविली जाणार आहे. या लसीकरणामुळे सात प्रकारच्या आजारांपासून रक्षण होत असल्याने आपल्या बाळांचे लसीकरण करवून घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मिशन इंद्रधनुष २.० तिसरी फेरी अंतर्गत जिल्हा टास्क फोर्सच्या सभेत गुरूवारी (दि.३०) अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. सभेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्यामसुंदर निमगडे, माता बालसंगोपन अधिकारी नितीन कापसे यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, समाज कल्याण विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अधिकारी उपस्थित होते.याप्रसंगी डॉ. दयानिधी यांनी, लसीकरणापासून सुटलेल्या व अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांची यादी तयार करु न १०० टक्के बालकांना संपूर्ण लसीकरण करण्याचे निर्देश दिले. डॉ. निमगडे यांनी, या फेरीत जिल्ह्यात ८८ बालके व ८ गरोदर मातांचे अर्धवट लसीकरण झालेले असल्यामुळे किंवा लसीकरणापासून वंचित असल्यामुळे त्यांना नियमित लसीकरण सत्रा व्यतिरिक्त, ३६ अतिरिक्त लसीकरण सत्रामध्ये लसीकरण करण्यात येईल असे सांगीतले.गोंदिया जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष २.० अंतर्गत ० ते २ वर्षे वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा अर्धवट लसीकरण झालेल्या तसेच वीट भट्टयामधील, स्थलांतरीत झालेले लोक, मजूरवस्ती इत्यादी ठिकाणच्या २ वर्षांतील बालकांचा आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत शोध घेवून त्यांना संपूर्ण लसीकरण करण्यात येणार आहे.ही मोहीम चार टप्प्यांमध्ये घेण्यात येणार असून चौथी फेरी माहे मार्च २०२० मध्ये घेण्यात येणार आहे. क्षयरोग, न्युमोनिया, डांग्या खोकला, घटसर्प, धनुर्वात, मेंदूज्वर व गोवर या सात आजारांपासून बचाव करण्याकरीता बाळांना लसीकरण केले जाते. 

टॅग्स :Healthआरोग्य