हक्कासाठी आंदोलन करण्यास सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 09:16 PM2018-08-31T21:16:35+5:302018-08-31T21:17:16+5:30

सर्व सामान्य जनतेला आपल्या हक्कासाठी नेहमी रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत असते. या शासनाने सुद्धा तीच परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी आंदोलन छेडण्यास सज्ज राहावे, असे आवाहन आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी येथे केले.

Get ready for the strike for the rights | हक्कासाठी आंदोलन करण्यास सज्ज राहा

हक्कासाठी आंदोलन करण्यास सज्ज राहा

Next
ठळक मुद्देसहषराम कोरोटे : काँग्रेस कार्यकर्ता मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्क
सालेकसा : सर्व सामान्य जनतेला आपल्या हक्कासाठी नेहमी रस्त्यावर उतरुन आंदोलन करावे लागत असते. या शासनाने सुद्धा तीच परिस्थिती निर्माण करुन ठेवली आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या हक्कासाठी आंदोलन छेडण्यास सज्ज राहावे, असे आवाहन आदिवासी नेते सहषराम कोरोटे यांनी येथे केले.
सालेकसा येथील गडमाता मंदिर परिसरात आयोजित काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याला मार्गदर्शन करताना ते बोलत होते. उद्घाटन आ. गोपालदास अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष पुरूषोत्त कटरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी व आदिवासी नेते सहषराम कोरोटे, माजी मंत्री भरतभाऊ बहेकार, माजी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, जि.प.सभापती लता दोनोडे, पं.स. सभापती अर्चना राऊत, माजी सभापती यादनलाल बनोटे, तालुकाध्यक्ष वासुदेव चुटे, पं.स. उपसभापती दिलीप वाघमारे, जि.प.सदस्य विजय टेकाम, माजी सभापती हिरालाल फाफनवाडे, पं.स. सदस्य भरत लिल्हारे, नगरसेवक कृष्णा भसारे, श्यामकला प्रधान उपस्थित होते.
या वेळी मार्गदर्शन करताना अग्रवाल म्हणाले, पक्षाला बळकट करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची असते. त्यासाठी जिद्द व इच्छाशक्ती वाढविणे गरजेचे असल्याचे सांगितले. शासनाने कर्जमाफीची घोषणा केली परंतु अद्यापही कर्जमाफीचा लाभ पूर्ण शेतकऱ्यांना मिळालेला नाही. नुकसान भरपाईची मदत देण्याच्या नावावर शेतकºयांना तलाठी कार्यालयापासून बँकापर्यंत रोज चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे अशा सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी तालुका काँग्रेस कमिटी, महिला काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस, सेवा दलच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

Web Title: Get ready for the strike for the rights

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.