शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य सेवेचा लाभ गोरगरिबांना मिळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2016 01:46 IST

आपला जिल्हा मागास, दुर्गम व आदिवासीबहुल आहे. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांकसुद्धा फार कमी आहे.

राजकुमार बडोले : आजपासून होणार लाईफलाईनच्या आरोग्य सेवेसाठी नोंदणीगोंदिया : आपला जिल्हा मागास, दुर्गम व आदिवासीबहुल आहे. जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांकसुद्धा फार कमी आहे. त्यामुळे गोरगरीब व गरजू रुग्णांना खाजगी उपचार करून घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गोरगरीब व गरजू रुग्णांना लाईफ लाईन एक्सप्रेसच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली.बुधवारी राज्य सरकारच्या मदतीने इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनद्वारा संचालित लाईफलाईन एक्सप्रेसच्या आरोग्य सेवेचे औपचारिक उद्घाटन पालकमंत्री बडोले यांनी लोकोशेडजवळ फित कापून केले. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी सी.एल.पुलकुंडवार, क्युरादेव फार्माचे सहायक महाप्रबंधक अशोक बियाणी, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ.संजय जायस्वाल, जि.प.उपाध्यक्ष रचना गहाणे, जि.प.समाजकल्याण सभापती देवराज वडगाये, भाजपाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार हेमंत पटले, जि.प.माजी उपाध्यक्ष विनोद अग्रवाल, इम्पॅक्ट इंडिया फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ.वैभव धाडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अजय केवलीया, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरीश कळमकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजय दोडके आदी प्रामुख्याने उपस्थित होते.देशातील अनेक शहरातील विविध आजारांवर शस्त्रक्रिया करणारे नामवंत तज्ज्ञ डॉक्टर येथे आपली सेवा देणार आहेत. सर्वसामान्य गोरगरीब व गरजू रुग्णांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे काम आणि त्यांची सेवा करण्याची संधी लाईफ लाईन एक्सप्रेसच्या माध्यमातून उपलब्ध झाल्याचे मान्यवरांनी सांगितले.जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी म्हणाले, ही लाईफ लाईन एक्सप्रेस जिल्ह्यातील जनतेसाठी सुवर्णसंधी आहे. सर्व यंत्रणांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चय करु न जास्तीत जास्त रु ग्णांना या सेवेचा लाभ मिळवून द्यावा. शस्त्रक्रि येसाठी पात्र रुग्ण शस्त्रक्रियेपासून वंचित राहणार नाही याकडे लक्ष द्यावे, ज्या शस्त्रक्रियेवर खाजगी रुग्णालयात एक ते दीड लाख रु पये खर्च येतो, ती शस्त्रक्रिया येथे मोफत करण्यात येणार आहेत. ही रेल्वेगाडी अर्थात आगगाडी नसून आरोग्यगाडी असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख डॉ.सूर्यवंशी यांनी केला. कार्यक्रमाला वरिष्ठ शल्य चिकित्सक डॉ.राजेंद्र जैन, भरत क्षत्रीय, सुनील केलनका, अपूर्व अग्रवाल, निर्मल अग्रवाल, मिनू बडगुजर, छत्रपाल तुरकर, डॉ.विनोद वाघमारे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी सुनील सोसे, डॉ.सुवर्णा हुबेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी, निसर्ग स्कूलच्या विद्यार्थिनी व नागरिकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि धकाते यांनी तर संचालन डॉ.रेखा सपाटे यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)