शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
3
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
4
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
5
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
6
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
7
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
8
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
9
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
10
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
11
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
12
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
13
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
14
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
15
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
16
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
17
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
18
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
19
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
20
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडी करणारी युवकांची टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:30 IST

गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक आमगाव येथे गस्त घालत असताना कुंभारटोली परिसरात दोन युवक संशयास्पद हालचाल करता ...

गोंदिया : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक आमगाव येथे गस्त घालत असताना कुंभारटोली परिसरात दोन युवक संशयास्पद हालचाल करता दिसून आले. दरम्यान त्यांची विचारपूस केली असता त्यांच्यावर संशय बळवला. त्यामुळे त्यांच्या जवळच्या पिशवीची तपासणी केल्याने दागिने हाती लागले. यावरून दागिने चोरीचे असल्याचे समोर आले. त्याचबरोबर त्या युवकांनी टोळीत आणखी चार युवकांचा समावेश असल्याचे सांगितले. यावरून घरफोडी करणाऱ्या टोळीला गजाआड करण्यात आले. आरोपींकडून ७८ हजार ६०० रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले. ही कारवाई रविवारी करण्यात आली.

आरोपींमध्ये ठुन्या उर्फ कुणाल राजेश साखरे (२२), रिंकू प्रकाश गेडाम (१९), मयूर शंकर गडकरी (२१), सहयोग पुरुषोत्तम घोडेस्वार (१९) सर्व रा.कुंभारटोली, शुभम राजकुमार मेश्राम (१९) रा.डोंगरगढ (छत्तीसगढ) व एका १७ वर्षीय युवकाचा समावेश आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अभय शिंदे व लिलेंद्र बैस, राजेश बडे, तुलसीदास लुटे, विठ्ठल ठाकरे, रंजीत बिसेन, चेतन पटले, सुजाता गेडाम यांचे पथक आमगाव क्षेत्रात गस्त घालत होते. दरम्यान कुंभारटोली परिसरात कुणाल साखरे व मयूर गडकरी हे दोन युवक संशयास्पद हालचाली करताना दिसून आले. पोलीस पथकाने दोन्ही युवकांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने सापडले. दरम्यान त्यांची विचारपूस केली असता कुंभारटोली येथील अशोक नंदेश्वर यांच्या घरचे दार तोडून १० व ११ मेच्या रात्री दागिने लंपास केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर या टोळीत मयूर गडकरी, शुभम मेश्राम, सहयोग घोडेस्वार हे देखील सहभागी असल्याचे सांगितले. यावरून सर्व आरोपींना अटक करून त्यांच्याकडून एकूण ८९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.