शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कल्याण केंद्रामार्फत ४ लाख ८४ हजारांचा निधी वाटप

By admin | Updated: April 25, 2017 00:52 IST

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी कामगार कल्याण निधी भरणा करणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.

विविध उपक्रम : कामगार व त्यांच्या कुुटुंबीयांसाठी अर्थसहाय्यगोंदिया : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने दरवर्षी कामगार कल्याण निधी भरणा करणाऱ्या कामगार व त्यांच्या कुटुंबासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. त्याअंतर्गत यावर्षी केंद्राच्या वतीने चार लाख ८४ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले.कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती, पाठ्यपुस्तके, एमएससीआयटी सहायता योजना, गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव, सत्कार योजनेंतर्गत कामगारांच्या मुलांना निधी वाटप तसेच विविध गंभीर आजारांसाठी कामगारांना आर्थिक मदत केली जाते. यावर्षीसुद्धा कामगार कल्याण केंद्र गोंदियाच्या वतीने चार लाख ८४ हजार रूपयांचे वाटप करण्यात आले.कामगारांच्या उत्थानासाठी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने कामगार कल्याण निधीचा वार्षिक भरणा केला जातो. यामध्ये कामगार ज्या ठिकाणी कार्यरत आहे, त्या कंपनीच्या संचालकाकडून कामगार कल्याण निधी जमा केली जाते. या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबीयांसाठी कामगार कल्याण केंद्रामार्फत अनेक योजना राबविण्यात येतात. त्या माध्यमातून कामगार व त्यांच्या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती व पाठ्यपुस्तकांसाठी पैसा वाटप केला जातो. याशिवाय असाध्य रोग व गंभीर आजार झाल्यास कामगारांना व कुटुंबीयांना अर्थसहाय्य दिले जाते.यावर्षी कामगार कल्याण मंडळांतर्गत कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ९५ विद्यार्थ्यांना दोन लाख ७१ हजार ५०० रूपयांचे वाटप करण्यात आले. पाठ्यपुस्तक सहायता योजनेंतर्गत १७ विद्यार्थ्यांना ११ हजार ८६१ रूपयांचे वाटप करण्यात आले. एमएससीआयटी योजनेंतर्गत आठ विद्यार्थ्यांना १३ हजार ६५० रूपयांचे वाटप करण्यात आले. असाध्य रोग व गंभीर आजार योजनेंतर्गत १३ कामगारांना एक लाख ८० हजार रूपयांचे वाटप करण्यात आले. क्रीडा शिष्यवृत्ती योजनेंतर्गत एका विद्यार्थ्याला दोन हजार रूपयांचे वाटप करण्यात आले. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी गुणगौरव सत्कार योजनेंतर्गत श्रद्धा सुभाष रामटेके या वर्ग बारावीच्या विद्यार्थिनीने ९१.५४ टक्के गुण मिळविल्याने तिला पाच हजार रूपये देवून सत्कार करण्यात आला. कामगार कल्याण केंद्रामार्फत अनेक योजना राबविल्या जातात. या योजनांचा कामगार व त्यांच्या कुटुंबीयांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कामगार कल्याण केंद्राचे संचालक ताम्रदीप जांभूळकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)