शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

शहरवासी व व्यापाऱ्यांना रान मोकळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST

अनलॉक करताना शासनाने नियमांचे कठोरतेने पालन करावे लागणार असे स्पष्ट केले आहे. मात्र शहरातील चित्र बघता येथे कोरोना कधी आलाच नव्हता असे दिसून येत आहे. बाजारपेठेतील गर्दी नियमांना धुडकावून होत असून शहरवासी नियम पाळत नसतानाच व्यापारीही नियमांना बगल देत आपला व्यापार करीत असल्याचे दिसत आहे. एकंदर मागील वर्षी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तयार झालेली स्थिती आता पुन्हा दिसून येत आहे.

ठळक मुद्देनियम धुडकावून नागरिक रस्त्यावर : कडक अंमलबजावकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्य शासनाने लॉकडाऊन शिथिल केले असून नागरिक तसेच व्यापारी वर्गाला मोठा दिलासा आहे. मात्र ही शिथिलता देताना नियमांची अंमलबजावणी करावी लागणार असे स्पष्ट आदेश दिले आहेत. मात्र शहरवासी व व्यापाऱ्यांना फक्त शिथिलताच लक्षात असून नियमांना धुडकावून एकच गर्दी होत आहे. अशात मात्र नियमांची अंमलबजावणी करवून घेण्याची जबाबदारी असलेल्या शासकीय यंत्रणेतील एकाही विभागाचे याकडे लक्ष नाही. परिणामी शहरवासी व व्यापाऱ्यांना रान मोकळे असून त्यांचा मनमर्जीपणा पुन्हा सुरू झाल्याचे दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आजही अंगावर काटे आणणारा आहे. या लाटेत कुणाचे काय हिरावून गेले याचा कुणीची अंदाज लावू शकत नाही. कोरोनाचा हा कहर कमी करण्यासाठी राज्यात शासनाला दुसऱ्यांदा लॉकडाऊन लावण्याची गरज पडली. आता दुसरी लाट ओसरत असून कोरोनाचा कहर कमी झालेल्या जिल्ह्यांना दिलासा देत राज्य शासनाने तेथील लॉकडाऊन शिथिल केले आहे. यात गोंदिया जिल्ह्याचा समावेश असून जिल्ह्यात अनलॉक करण्यात आले आहे. मात्र अनलॉक करताच आता शहरवासी व व्यापारी गेलेले दिवस विसरून पुन्हा एकदा अतिरेक करताना दिसत आहेत. अनलॉक करताना शासनाने नियमांचे कठोरतेने पालन करावे लागणार असे स्पष्ट केले आहे. मात्र शहरातील चित्र बघता येथे कोरोना कधी आलाच नव्हता असे दिसून येत आहे. बाजारपेठेतील गर्दी नियमांना धुडकावून होत असून शहरवासी नियम पाळत नसतानाच व्यापारीही नियमांना बगल देत आपला व्यापार करीत असल्याचे दिसत आहे. एकंदर मागील वर्षी लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर तयार झालेली स्थिती आता पुन्हा दिसून येत आहे. असे असतानाही प्रशासनाच्या एकाही विभागाकडून यावर नजर ठेवली जात नसल्याची तेवढीच शोकांतीका आहे. शहरवासी व व्यापारी नियम तोडत असल्याने यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.  

ना मास्क - ना शारीरिक अंतराचे पालन - कोरोनाला दूर ठेवण्यासाठी नियमित मास्क लावणे व शारीरिक अंतराचे पालन करणे हेच सूत्र आहे. मात्र शहरातील आजची स्थिती बघता ना मास्क- ना शारीरिक अंतराचे पालन केले जात आहे. विशेष म्हणजे, सर्वसामान्य नागरिक याकडे दुर्लक्ष करीत असतानाच व्यापारीही आपल्या दुकानांत या नियमांची अंमलबजावणी करवून घेताना दिसत नाही. यावर वेळीच आवर घालण्याची गरज आहे.नगर परिषदेचे पथक गायब - शहरातील बाजारपेठ तसेच प्रत्येकच भागात कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी व्हावी यासाठी नगर परिषदेने पथक तयार केले होते. हे पथक या सर्व बाबींवर नजर ठेवून होते व वेळी दंडात्मक कारवाई करीत होते. मात्र आता हे पथक गायब दिसेनासे झाले आहे. त्यांना पुन्हा एकदा एव्क्टीव्ह करण्याची गरज निर्माण झाली आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार