शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

चार अपघातांत चार ठार

By admin | Updated: June 4, 2014 00:08 IST

जिल्ह्यातील तिरोडा, केशोरी, देवरी व रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या विविध अपघातांत चौघे ठार झाले. सोमवारी व मंगळवारी हे अपघात घडले असून मारोती कोदू मेश्राम (२४), अवेद खॉ

जिल्हा हादरला : तिरोडा, केशोरी, देवरी व रावणवाडी येथील घटनागोंदिया : जिल्ह्यातील तिरोडा, केशोरी, देवरी व रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत घडलेल्या विविध अपघातांत चौघे ठार झाले. सोमवारी व मंगळवारी हे अपघात घडले असून मारोती कोदू मेश्राम (२४),  अवेद खॉ जलील खॉ पठाण (२५,रा. वाढवी), कांता गोपालराव मेश्राम (५२,रा.देवरी) व दिलीप भाकचंद सहारे (५४,रा. दासगाव) असे मृतांचे नाव आहे. यामध्ये पहिल्या घटनेत, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत भजेपार येथे सोमवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान ट्राली एम.एच. ३५/५४७१ असलेल्या विन क्रमांकाच्या ट्रॅक्टरने सायकलस्वार मारोती मेश्राम (२४) यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन मारोती यांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालकाविरूध्द तिरोडा पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३0४ (अ), सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.दुसर्‍या घटनेत, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत परसटोला येथील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला दुचाकी धडकल्याने मोटारसायकल चालक जागीच ठार झाला. अवेद खॉ जलील खॉ पठाण (२५,रा.वाढवी) हे  मोटारसायकल एम.एच.३४/टी.६१४0 ने भरधाव वेगात जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने मोटारसायकल रस्त्याच्या कडेला झाडाला धडकली व यातच गंभीर जखमी होऊन अवेद पठाण यांचा मृत्यू झाला.  या घटनेसंदर्भात केशोरी पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३0४ (अ) सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. तिसर्‍या घटनेत,  देवरी येथे पोलीस ठाण्यासमोर ट्रकच्या तावडीत येऊन शिक्षिका ठार झाली आहे. मंगळवारी दुपारी १२ च्या सुमारास शिक्षिका कांता मेश्राम (५२,रा. वार्ड क्र. ६, देवरी) यांची पुतणी ग्रामीण रुग्णालयात भर्ती असल्याने तिला बघण्यासाठी त्या पुतण्या संदीप प्रकाश मेश्राम (२७) याच्या सोबत मोटारसायकल एमएच ३५ / ई ३१0५ ने रूग्णालयात जात होत्या. दरम्यान याच रस्त्याने जात असलेल्या ट्रक क्रमांक एमएच ३५/ के ५६८ ला ओव्हरटेक करण्याच्या नादात संदीपची मोटारसायकल घसरली. यात कांता मेश्राम या  ट्रकच्या चाकाखाली आल्या व त्यांचा जीव गेला. तर संदीप बाजूला पडल्याने त्याचा जीव बचावला. या घटने संदर्भात ट्रक चालक जिब्राईल शेख मोहमद शेख (३८,रा. सेलटेक्स कॉलोनी, गोंदिया) यांच्या विरुद्ध देवरी पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३७, ३0४ (अ) सह कलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. ट्रक चालक देवरी येथील धान भरुन गोंदियाकडे येत होता. संदीप ने दुचाकीला ट्रकच्या डाव्या बाजूने ओव्हरटेक केल्यामुळे सदर अपघात घडल्याचे बोलले जात आहे. तर चौथ्या घटनेत, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत दासगाव येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम ठार झाला. सोमवारच्या रात्री ९ वाजता दरम्यान घडलेल्या या घटनेत खारीगरम विक्री करुन आपल्या घरी पायी जाणार्‍या दिलीप भाकचंद सहारे (५४, रा. दासगाव) यांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले. हरेंद्र दिलीप सहारे यांच्या तक्रारीवरुन सदर घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३0४ (अ) सहकलम १३४ मोटारवाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)