पुराचा ३० गावांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 05:00 IST2020-08-31T05:00:00+5:302020-08-31T05:00:41+5:30
रविवारी पावसाचा जोर ओसरल्या जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. मात्र वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने २० गावे अद्यापही पाण्याखाली होती. गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला, कासा, बाम्हणटोला, महालगाव, मुरदाडा व तिरोडा तालुक्यातील धापेवाडा, ढिवरटोला, चांदोरी, ढिवरटोला, सावरा, घाटकुरोडा या गावांचा संपर्क अद्यापही तालुक्यापासून तुटलेला होता. पूर परिस्थिती लक्षात घेता नदी काठलगतच्या गावांमधील १२८२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले.

पुराचा ३० गावांना फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे आणि मध्यप्रदेशातील संजय सरोवरचे पाणी सोडल्याने वैनगंगा नदीच्या पाणी पातळी वाढ झाल्याने गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील ३० गावात पूर परिस्थिती निर्माण झाली. या दोन्ही तालुक्यातील २० गावांचा संपर्क रविवारी (दि.३०) सलग दुसऱ्या दिवशी तुटलेला होता.आपत्ती व्यवस्थापन विभागाने या गावांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवून १३६ नागरिकांना सुखरुपणे बाहेर काढले. तर पूर परिस्थिती लक्षात घेता १२८२ नागरिकांना शाळा आणि समाज मंदिरांमध्ये हलविण्यात आले आहे.
रविवारी पावसाचा जोर ओसरल्या जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला. मात्र वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने २० गावे अद्यापही पाण्याखाली होती. गोंदिया तालुक्यातील पुजारीटोला, कासा, बाम्हणटोला, महालगाव, मुरदाडा व तिरोडा तालुक्यातील धापेवाडा, ढिवरटोला, चांदोरी, ढिवरटोला, सावरा, घाटकुरोडा या गावांचा संपर्क अद्यापही तालुक्यापासून तुटलेला होता. पूर परिस्थिती लक्षात घेता नदी काठलगतच्या गावांमधील १२८२ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. या नागरिकांची राहण्याची व्यवस्था प्रशासनाच्यावतीने शाळा आणि समाज मंदिरामध्ये करण्यात आली. आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सलग दुसºया दिवशी गोंदिया आणि तिरोडा तालुक्यात रेस्क्यू ऑपरेशन राबववून पूरग्रस्त गावात अडकलेल्या गावकऱ्यांना बोटीव्दारे बाहेर काढले. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने या गावांना पुराचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासन अर्लट मोडवर असून नागरिकांना सर्तक राहण्याचा इशारा दिला आहे. पुराचा सर्वाधिक फटका धान पिकांना बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या तीन दिवसांपासून हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली असल्याने ती सडण्याची आणि वाहून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मध्यप्रदेशातील पावसाने महाराष्ट्रात पूर परिस्थिती
मागील तीन चार दिवसांपासून मध्यप्रदेशात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. शनिवारी (दि.२९) संजय सरोवराचे १० दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.परिणामी गोंदिया आणि तिरोडा तालुक्यातील एकूण ३० गावांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली.
पाऊस ओसरला तरी सतर्कतेचा इशारा
जिल्ह्यात शनिवारपासून पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला आहे. त्यामुळे काही भागातील परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. मात्र वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
घरांची पडझड सुरूच
जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे आणि निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शेकडो घर मागील दोन दिवसांपासून पाण्याखाली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर घरांची पडझड झाली आहे. पावसामुळे पडझड झालेल्या घरांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पण काही गावांमध्ये अद्यापही पूर परिस्थिती असल्याने या भागात सर्वेक्षण करण्यात आले नाही.
इटियाडोह धरण ओव्हर फ्लो च्या उंबरठ्यावर
मागील तीन दिवस झालेल्या दमदार पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. नवेगावबांध जलाशय ओव्हर फ्लो झाले असून रविवारी इटियाडोह धरण सुध्दा ९८ टक्के भरले असल्याने ते कोणत्याही क्षणी ओव्हर फ्लो होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे धरण क्षेत्रात येणाºया गावकºयांना प्रशासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहे.