शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करणाऱ्याला पाच वर्षाची शिक्षा

By admin | Updated: October 29, 2015 00:19 IST

गोरेगाव तालुक्याच्या म्हसगाव येथील १६ वर्षाच्या मुलीवर बळजबरी करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या म्हसगाव येथील १६ वर्षाच्या मुलीवर बळजबरी करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मनिराम सेवकराम बोपचे (२९) रा. म्हसगाव, ता. गोरेगाव असे आरोपीचे नाव आहे. त्याने गावातील १६ वर्षाच्या मुलीला एकटी पाहून तिच्यावर ११ नोव्हेंबर २००९ च्या दुपारी ३ वाजता बळजबरी केली. तिची आई शेतावर शेळ्या घेऊन गेली होती. हे प्रकरण महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीकडे गेले. परंतु हे प्रकरण हाताळण्याचा अधिकार तंटामुक्त समितीला नसल्यामुळे त्यांनी ते प्रकरण पोलिसांकडे पाठविले. आदिवासी समाजातील ती मुलगी आहे. परंतु तिच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नसल्यामुळे अ‍ॅट्रासिटीचा गुन्हा दाखल झाला नव्हता. या प्रकरणाचा तपास गोंदियाचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष कुंभारे यांनी केला. या प्रकरणावर बुधवारी सुनावणी करण्यात आली. जिल्हा न्यायाधीश १ एस.आर. त्रिवेदी यांनी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.शबाना अंसारी यांनी काम पाहिले. कलम ३७६ अन्वये पाच वर्षाची शिक्षा व एक हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, कलम ५११ अन्वये एक वर्षाची शिक्षा एक हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा, कलम ४४८ अंतर्गत एक वर्षाची शिक्षा, कलम ४५१ अंतर्गत दोन वर्षाची शिक्षा व १ हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास एक महिन्याची शिक्षा सुनावली आहे. पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, उपनिरीक्षक सचिन धुमाळ, महिला हवालदार सुधा गणवीर, सीएमएससेलचे महेश महाले, एस.सी. फुलसुंगे यांनी सहकार्य केले.