शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पाच वर्षाची शिक्षा

By admin | Updated: April 2, 2015 01:10 IST

वर्गातील विद्यार्थिनीला अभ्यासासंदर्भात अधिक माहिती देण्याच्या नावावर आपल्या खोलीवर बोलाविणाऱ्या शिक्षकाने तिचा विनयभंग केला होता.

गोंदिया : वर्गातील विद्यार्थिनीला अभ्यासासंदर्भात अधिक माहिती देण्याच्या नावावर आपल्या खोलीवर बोलाविणाऱ्या शिक्षकाने तिचा विनयभंग केला होता. या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने त्या आरोपी शिक्षकाला पाच वर्षाची शिक्षा सुनावली आहे.प्राप्त माहितीनुसार, गोंदिया तालुक्याच्या अदासी येथील स्व. पोहुमल हायस्कूल येथे कार्यरत शिक्षक शामराव सुदाम नेताम (२८) रा. बोंडे ता.देवरी हा पोहुमल शाळेत मराठी व भूगोल या विषयाचा शिक्षक होता. तो वर्गात विषय न शिकविता मुलामुलींना मुले कसे होतात याचे लैंगिक शिक्षण देत होता. त्याने दागोटोला येथील एका १४ वर्षाच्या मुलीला २४ डिसेंबर २०१३ रोजी शाळा सुटल्यानंतर आपल्या खोलीवर अभ्यासासाठी एकटीच ये म्हणून बोलावले. ती त्याच्या खोलीवर गेली असता त्याने तिचा विनयभंग केला. यावेळी ती घाबरली. याबाबत कुणाला माहिती देऊ नकोस अन्यथा तुला नापास करील अशी धमकी दिली. धास्तावलेल्या त्या मुलीने पहिल्या दिवशी या घटनेची माहिती कुणाला सांगितली नाही. दुसऱ्या दिवशी तिने आपल्या मैत्रीणीला सांगितले. त्यानंतर आपल्या मोठ्या बहिणीला सांगितले. या घटनेची माहिती पिडीत मुलीच्या वडीलांना होताच त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिका व संस्था संचालक यांना सदर घटनेची माहिती देत त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. या घटनेनंतर १० फेब्रुवारी २०१४ रोजी सकाळी १०.३० वाजतादरम्यान ती एकटीच सायकलने जात असताना तिला रस्त्यात पकडून तिला धमकी दिली. गोंदिया ग्रामीण पोलिसात आरोपी शामराव नेताम याच्याविरूध्द भादंविच्या कलम ३५४ अ, ३४१, ५०६, सहकलम बाललैंगिक अत्याचार अधिनियम कलम ८, १२ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक अमरीश देशमुख यांनी केला होता. या प्रकरणात सरकारी वकील म्हणून जबाबदारी अ‍ॅण्ड. शबाना अंसारी यांनी सांभाळली. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात सीएमएस सेलचे प्रभारी महेश महाले व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी काम केले. (तालुका प्रतिनिधी)दंडाची रक्कम पीडित मुलीलाप्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश आर. जी. अस्मार यांनी सुनावणी केली. बाल लैंगिक अत्यार अधिनियम कलम ८ अंतर्गत पाच वर्षाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड सुनावला. दंड न भरल्यास ६ महिन्याची शिक्षा, कलम १२ अंतर्गत पाच वर्षाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड सुनावला. दंड न भरल्यास ६ महिन्याची शिक्षा, कलम ३५४ अ(१) अंतर्गत दोन वर्षाची शिक्षा व एक हजार रूपये दंड सुनावला. दंड न भरल्यास २ महिन्याची शिक्षा, कलम ३५४ अ (४) अंतर्गत सहा महिन्याची शिक्षा व ७०० रूपये दंड सुनावला. दंड न भरल्यास १५ दिवसाची शिक्षा, कलम ५०६ अंतर्गत दोन वर्षाची शिक्षा व पाच हजार रूपये दंड सुनावला. दंड न भरल्यास १० दिवसाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील १२ हजार ५०० रूपये दंडाची रक्कम पिडीत मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.