शंभर गरजू कुटुंबांना पाचशे किलो धान्याचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 05:00 IST2020-04-19T05:00:00+5:302020-04-19T05:00:39+5:30
संचारबंदी लॉकडाऊन नियमांचे नागरिकांनी पालन करावे याकरीता पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक अतुलकर व अधिनस्त अधिकारी, कर्मचारी सतत पेट्रोलिंग करीत आहेत. याच दरम्यान त्यांना मोहरानटोली येथे काही मजूर कुटुंब अन्नधान्यापासून वंचित असल्याची माहिती मिळाली.

शंभर गरजू कुटुंबांना पाचशे किलो धान्याचे वाटप
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाºया मोहरानटोली येथे शंभर मजुरांचे कुटुंब व वाटसरू अडकले असल्याची माहिती येथील प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुलकर मिळाली. यानंतर त्यांनी मोहरानटोली येथे जाऊन पाहणी केली. येथील मजुरांच्या मदतीची व्यवस्था करण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेतले. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने त्यांना अन्नधान्य पुरविण्याची व्यवस्था केली. मोहरानटोली येथील शंभर कुटूंब मजूर व मुसाफीर यांना पाचशे किलो अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
संचारबंदी लॉकडाऊन नियमांचे नागरिकांनी पालन करावे याकरीता पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक अतुलकर व अधिनस्त अधिकारी, कर्मचारी सतत पेट्रोलिंग करीत आहेत. याच दरम्यान त्यांना मोहरानटोली येथे काही मजूर कुटुंब अन्नधान्यापासून वंचित असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर अतुलकर यांनी पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक उमेश गुटाळ, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास भोर, पोलीस उपनिरीक्षक बाबू मुंडे, पोलीस हवालदार मिलकीराम पटले, पोलीस हवालदार शेखर खोब्रागडे, राजेश भुरे, गितेंद्र डिबे, राजू गुरुभेले, अजय पटले, शरद चव्हाण, खेमचंद बिसेन, संजीव चकोले, दिपक लिल्हारे, रुपेश कटरे, दिपक ढोले, रंजीता तांडेकर, भारती यावलकर, वाहन चालक घनशाम कुंभलवार,सोहनलाल लांजेवार यांनी सहकार्य केले.