शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

दीड महिन्यानंतर बाधितांच्या आकड्यात प्रथमच झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 05:00 IST

विदर्भातील काही जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात होती. पण गुरुवारी दीड महिन्यानंतर प्रथमच २४ कोरोना बाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव वाढल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्हावासीयांनी ही बाब गांर्भियाने घेत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे.

ठळक मुद्दे२४ नवीन रुग्णांची नोंद : पाच बाधितांनी केली मात, नागरिकांनो काळजी घ्या

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया:  जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात असल्याचे चित्र असताना गुरुवारी (दि.२५) तब्बल दीड महिन्यानंतर कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. गुरुवारी जिल्ह्यात २४ बाधितांची नोंद झाली तर ५ बाधितांनी कोरोनावर मात केली. कोरोना बाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाल्याने जिल्हावासीयांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र गोंदिया जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात होती. पण गुरुवारी दीड महिन्यानंतर प्रथमच २४ कोरोना बाधितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव वाढल्याचे चित्र आहे. यामुळे जिल्हावासीयांनी ही बाब गांर्भियाने घेत कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेण्याची गरज आहे. गुरुवारी आढळलेल्या २४ बाधितांमध्ये सर्वाधिक १६ बाधित गोंदिया तालुक्यातील आहे. तर तिरोडा १, गोरेगाव १, आमगाव १, सालेकसा १, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील चार बाधितांचा समावेश आहे. विशेष म्हणजे जवळपास महिनाभर कोरोनामुक्त असलेल्या तालुक्यांमध्ये सुध्दा आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ६९७१८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी तपासणी करण्यात आले. यापैकी ५७९७८ नमुने निगेटिव्ह आले आहे. कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजन टेस्ट केली जात आहे. यातंर्गत ६८२५६ स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ६२०६४ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४३८९ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १४१०८ बाधितांनी मात केली आहे. सद्यस्थितीत ९६ कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून ११ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. संसर्ग वाढतोय, काळजी घ्या जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मात्र जिल्हावासीयांनी ही बाब अद्यापही गांभीर्याने घेतली नाही. कोरोनाकडे दुर्लक्ष करणे म्हणजे पुन्हा कोरोना विस्फोटाला आमंत्रण देणारे ठरत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या