शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
स्मरण दिन अन् गुरुवार, सलग २ दिवस सेवा करायची सुवर्ण संधी; स्वामी महाराज शुभ तेच होईल!
7
स्वामी समर्थ पुण्यतिथी: 'स्वामी' म्हणजे नक्की कोण? 'या' शब्दाचा गर्भितार्थ तुम्हाला माहीत होता का?
8
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
9
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
10
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
11
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
12
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
13
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
14
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
15
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
16
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
17
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
18
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
19
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
20
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राज्य शासनाने काढलेले परिपत्रक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:20 IST

गोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १९ मे रोजी पत्राद्वारे पणन हंगाम २०२०-२१ (रब्बी) धान खरेदीबाबत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे ...

गोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने १९ मे रोजी पत्राद्वारे पणन हंगाम २०२०-२१ (रब्बी) धान खरेदीबाबत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदी करणे शासनावर बंधनकारक नाही, असे आदेश काढून शेतकऱ्यांमध्ये फार मोठा संभ्रम निर्माण केला होता. आ. डॉ. परिणय फुके याप्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर अखेर राज्य शासनाने हे परिपत्रक रद्द केले आहे.

राज्य शासनाच्या १९ मे रोजीच्या परिपत्रकामुळे शेतकऱ्यांमध्ये गोंध‌ळ उडाला होता. धान उत्पादन असलेल्या गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली येथील शेतकऱ्यांनी शासनाकडे ही अ‍ट रद्द करावी, अशी मागणीसुध्दा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केली होती. परंतु शेतकऱ्यांची व्यथा ऐकायला या सरकारकडे वेळ नव्हता. हा तुघलकी आदेश रद्द करावा याकरिता आमदार डॉ. फुके यांनी मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन निवेदनसुध्दा दिले होते. एवढेच नव्हे तर, १९ मे चे परिपत्रक तत्काळ रद्द करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा निवेदन वजा इशाराच भेटी दरम्यान दिला होता. यावर अखेर राज्य शासनाने २ जून रोजी परिपत्रक काढून १९ मे रोजी काढलेल्या परिपत्रकातील त्या उल्लेखामुळे निर्माण झालेला संभ्रम दूर होण्यासाठी धान घेणे बंधनकारक नाहीची अट रद्द करण्याबाबतचा केलेला उल्लेख मागे घेतला. यामुळे आता शेतकऱ्यांच्या पूर्ण धानाची उचल सरकार करणार आहे.