शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईचे अंतीम प्रवेश ३१ ऑगस्टपर्यंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 05:00 IST

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत (लॉटरी) १७ मार्च रोजी काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चीत करावयाचा आहे. त्यानंतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास प्रवेश दिला जाणार नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : सन २०२०-२१ च्या आरटीईच्या २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत लॉटरी लागलेल्या विद्यार्थ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्याची शेवटची तारीख निश्चीत करण्यात आली आहे. तर त्यानंतर १ सप्टेंबर पासून वेटींगवर असलेल्या विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार सोडत (लॉटरी) १७ मार्च रोजी काढण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना लॉटरी लागली आहे त्यांनी ३१ ऑगस्टपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चीत करावयाचा आहे. त्यानंतर लॉटरी लागलेल्या कोणत्याही बालकास प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ३१ ऑगस्ट नंतर प्रतिक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता पडताळणी समितीकडे पालकांनी गर्दी करू नये, ज्या बालकांना लॉटरी लागली आहे त्या शाळेत ३१ ऑगस्टच्या आत जाऊन प्रवेश निश्चीत करावा. प्रवेश निश्चीत करणे शक्य नसल्यास ई-मलेद्वारे कागदपत्र शाळेत पाठवून दुरध्वनीद्वारे शाळेतील मुख्याध्यापकांशी संपर्क करून पालकांनी प्रवेश निश्चीत करावा. शाळांनी त्यांना आरटीई पोर्टलवर जी यादी प्राप्त झाली आहे त्या यादीतील अद्याप शाळेत प्रवेशासाठी न आलेल्या बालकांच्या पालकांना दुरध्वनी व ई-मेलद्वारे संपर्क साधून त्यांच्या प्रवेशाची कार्यवाही ३१ ऑगस्टच्या आत पूर्ण करावी अशा सूचना शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजकुमार हिवारे यांनी दिल्या आहेत. जिल्ह्यात ९०३ विद्यार्थ्यांना प्रवेश द्यायचा आहे. यापैकी ७२९ विद्यार्थ्यांनी ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित १७४ विद्यार्थ्यांचे पालक आपल्या पाल्यांचा प्रवेश निश्चीत करण्यासाठी अद्याप शाळेत गेले नाहीत.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र