शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
3
Top Marathi News LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज यूएईमध्ये; इंधनाचे दर, तुटवडा यावरील चर्चा महत्त्वाची
4
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
5
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
6
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
7
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
8
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
9
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
10
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
11
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
12
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
13
सामान्यांचा खिसा आणखी रिकामा; महागाईचा ४२ महिन्यांचा उच्चांक; महागाईत सर्वाधिक तीव्र वाढ
14
डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचे निधन; ६८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
Sunil Bharti Mittal: अदानी-अंबानींच्या मार्गावर सुनील मित्तल; १० वर्षांत सोडणार Airtel ची खुर्ची, कोण असेल उत्तराधिकारी?
16
व्हॉट्सॲपवर ‘एआय’सोबतच्या गप्पा राहणार आता अतिशय गुप्त!
17
Petrol Diesel price hike: महागाईच्या झळा सुरू, पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ! प्रति लिटर ३ रुपयांनी महाग झाले इंधन
18
सेन्सेक्स लवकरच ८९ हजारांवर? ‘मॉर्गन स्टॅन्ले’चा अहवाल; १५ टक्के वाढीचा अंदाज
19
आजचे राशीभविष्य - १५ मे २०२६, आर्थिक स्थिती मजबूत दिसेल; गैरसमजा पासून जपून राहावे
20
नॉर्मल पेट्रोल आणि प्रीमियम पेट्रोल म्हणजे काय? दोन्हीच्या किमतीत किती फरक असतो? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

२.२१ कोटींचा अपहार करणार्‍या नाझरवर गुन्हा दाखल

By admin | Updated: June 8, 2014 23:56 IST

देवरी येथील तहसील कार्यालयात कार्यरत नाझर म्हणून कार्यरत असलेले नामदेव शंकर बुटे याने विविध योजनेचे २ कोटी २१ लाख ६0 हजार ६0५ रूपये बँकेतून खोट्या दस्तावेजाच्या आधारे काढले.

आरोपी फरार : देवरी तहसील कार्यालयातील प्रताप
गोंदिया : देवरी येथील तहसील कार्यालयात कार्यरत नाझर म्हणून कार्यरत असलेले नामदेव शंकर बुटे याने विविध योजनेचे २ कोटी २१ लाख ६0 हजार ६0५ रूपये बँकेतून खोट्या दस्तावेजाच्या आधारे काढले. त्या नाझर विरुध्द देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अतवृष्टीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकर्‍यांना द्यायच्या शासकीय मदतीचे धनादेश परस्पर वटवून त्यांचा अपहार केल्याची तक्रार तहसीलदार रवींद्र चव्हाण यांनी शनिवारी केली होतीे.
मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात आणि पावसाळा संपल्यानंतरही जिल्ह्यात झालेल्या अतवृष्टीने शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे केंद्र सरकारच्या आपत्ती निवारण समितीने चमू पाठवून पिकांची पाहणी केली. राज्य सरकारनेही हिवाळी अधिवेशनात मदत जाहीर केली होती.
ही मदत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना त्यांच्या बँक खात्यात जमा करायची होती. हे काम तहसील कार्यालयामार्फत केले जात आहे. देवरी तालुक्यातील लाभार्थी शेतकर्‍यांची यादी आणि त्यांच्या मदतीच्या रकमेची यादी तहसील कार्यालयाकडून जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे देण्यात आली. सोबतच त्यांच्या मदतीचा धनादेशही बँकेकडे देण्यात आला.
परंतु देवरी तहसील कार्यालयाचे नाझर नामदेव शंकर बुटे यांनी गेल्या डिसेंबर महिन्यापासून तहसीलदारांकडून बँकेकडे देण्यात आलेले धनादेश प्रत्यक्षात शेतकर्‍यांच्या खात्यावर वळते न करता स्वत:च ती रक्कम काढून घेतली. हा प्रकार डिसेंबर २0१३ ते ३ मे २0१४ या दरम्यान घडला.
ही रक्कम हडप केल्याचा प्रकार विद्यमान तहसीलदार चव्हाण यांच्या लक्षात आला. आतापर्यंत २ कोटी २१ लाख ६0 हजार ६0५ रुपयांची रक्कम हडप केल्याने देवरी पोलिसात त्याच्या विरूध्द भादंविच्या कलम ४0९, ४६७, ४६८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. देवरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला मात्र नाझरला अटक करण्यात आली नाही. तो फरार असल्याचे सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)