शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

‘त्यांचा’ हार-फुलांनी सत्कार

By admin | Updated: February 8, 2016 01:48 IST

उघड्यावर शौच करीत असलेल्या बहाद्दरांचा हार व फुलांनी सत्कार करण्याचा आगळावेगळा उपक्रम पालिकेच्या ‘गुड मॉर्निंग पथकाने’ हाती घेतला आहे.

कपिल केकत गोंदियाउघड्यावर शौच करीत असलेल्या बहाद्दरांचा हार व फुलांनी सत्कार करण्याचा आगळावेगळा उपक्रम पालिकेच्या ‘गुड मॉर्निंग पथकाने’ हाती घेतला आहे. उघड्यावरील शौचाच्या प्रकारावर आळा बसावा व अशा शौच बहाद्दरांत शौचालय बांधकामाबाबत जनजागृती निर्माण करता यावी, यासाठी पालिकेने या पथकाने गठन केले असून शहरातील विविध भागांत हे पथक सकाळी हा उपक्रम राबवित आहे. ग्रामीण भागातच उघड्यावरील शौचाचा प्रकार होतो असे आपणास वाटते. मात्र ही वास्तवीकता नसून शहरातही हा प्रकार आजही सुरूच आहे. आजही शहरातील कित्येक परिवारांकडे शौचालय नाही. अशात त्यांना दररोज सकाळी उघड्यावर शौच करावे लागत आहे. परिणामी हागणदारीमुक्तीचा शासनाचा संकल्प अद्याप फलीतास आला नाही. हागणदारी मुक्तीसाठी शासनाकडून अभियान राबवून त्यावर कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र नागरिकांत जोपर्यंत जागृती येत नाही तोवर या अभियानाचा काहीच उपयोग नाही हे यातून सिद्ध होते. शहरातही उघड्यावरील शौचाचे हे प्रकार सुरू असून हा प्रकार संपुष्टात यावा व वातावरण दूषित होऊ नये यासाठी स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत नागरी शौचालय बांधकामाची मोहीम शासन राबवित आहे. नगर परिषदेतही शौचालय बांधकामाची ही मोहीम सुरू असून शौचालय नसलेल्या परिवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. हजारांच्या घरात शौचालयांचे बांधकाम सुरू असून आणखीही परिवारांना शौचालयांचे बांधकाम अनुदान तत्वावर करवून दिले जाणार आहे. असे असतानाही एकही कुटूंब यापासून सुटू नये व उघड्यावरील शौचाचा प्रकार शहरात होऊ नये. या प्रकारातून निर्माण होणारी रोगराईची स्थिती शहरात हातपाय पसरू नये या दृष्टीने शौचालय बांधकामासोबतच पालिकेने आता एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी पालिकेने ‘गुड मॉर्निंग पथक’ गठीत केले आहे. हे ‘गुड मॉर्निंग पथक’आठवड्यातील तीन दिवस शहरातील विविध भागांत जाऊन उघड्यावर शौच करणाऱ्यांचा हार घालून किंवा फुल देऊन सत्कार करीत आहेत. यातून हे पथक समोरच्या व्यक्तीला तो किती मोठी चूक करीत आहे याची कल्पना करवून देत आहे. तसेच या माध्यमातून शौचालय बांधकामाबाबत जनजागृती निर्माण केली जात आहे. मोहीम सकाळी ६.३० वाजतापासून सकाळी ६.३० वाजतापासून पथकाची ही मोहीम सुरू होते. शहराच्या बाहेरील भागात येत असलेल्या मरारटोली, पिंडकेपार, सुंदरनगर, सुर्याटोला, छोटा गोंदिया आदी परिसरांत उघड्यावरील शौचाचे प्रकार आजही सुरू आहेत. त्यामुळे या भागांत जावून जनजागृतीचा हा कार्यक्रम राबवित आहेत. नागरिकांत जनजागृती आल्यावरच उघड्यावरील शौचाच्या प्रकारावर आळा बसेल ही बाब हेरूनच पालिकेकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पथकात कुणाचा समावेश? पालिके ने गठीत केलेल्या ‘गुड मॉर्निंग पथका’त प्रशासनिक अधिकारी सी.ए. राणे, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे कनिष्ठ अभियंता फिरोज बिसेन, बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता नूतन कोरडे, आरोग्य निरीक्षक पुरूषोत्तम मनकवडे, गणेश हतकय्या, मनिष बैरीसाल, मुकेश शेंद्रे, मुकेश तिवारी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मुख्याधिकारी गुणवंत वाहूरवाघ हे सुद्धा या पथकासोबत शहरातील विविध भागांत जाऊन पाहणी करीत आहेत.