शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकाचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
2
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
3
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
4
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
5
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
6
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
7
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
8
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
9
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
10
१ लाखाचे बनले १.७० कोटी रुपये, आता 'हा' आहे देशातील सर्वात महागडा शेअर
11
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
12
“संविधान हाच राष्ट्रधर्म, इंदू मिल स्मारकाचे काम वेगाने पूर्ण करणार”: DCM एकनाथ शिंदे
13
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
14
VIDEO: काव्या मारनला सर्वांसमोर कुणी दिला गुलाब? SRHच्या विजयानंतर घडला किस्सा
15
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
16
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
17
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
18
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
19
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्र परवान्याचीही फॅशन; जिल्ह्यात ५१७ जणांकडे परवाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:20 IST

गोंदिया : गोंदियात संघटित गुन्हेगारी सक्रिय आहे. गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आरोपींवर मोक्का लावतात. तरीदेखील काही टोळ्या टप्प्याटप्याने ...

गोंदिया : गोंदियात संघटित गुन्हेगारी सक्रिय आहे. गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा आरोपींवर मोक्का लावतात. तरीदेखील काही टोळ्या टप्प्याटप्याने जन्म घेत आहेत. गोंदिया शहरात मोठ्या प्रमाणात देशी कट्टे वापरणारे लोक आहेत. आपसी वैमनस्यातून एकमेकांचा काटा काढण्यासाठी किंवा एकमेकाला धमकाविण्यासाठी या देशी कट्ट्यांचा सर्रास वापर केला जात आहे. मध्यप्रदेश व छत्तीसगड येथून गोंदियात येणाऱ्या या देशी कट्ट्यांच्या गोरखधंद्याला पायबंद घालण्याची गरज आहे. आता शस्त्र परवान्याचीही फॅशन तयार झाली असून गोंदिया जिल्ह्यात ५१७ जणांकडे परवाने असल्याची माहिती पुढे आली आहे.

गोंदिया शहराला काही बड्या लोकांनी मिनी मुंबई म्हणून संबाेधले आहे. या मिनी मुंबई असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात देशी कट्टे वापरले जात आहेत. एखादा गुन्हा घडला तर त्या देशी कट्ट्यांचा विषय पुढे येतो अन्यथा या देशी कट्ट्यांकडे दुर्लक्ष हाेत आहे. परवाना घेतल्याशिवाय बंदूक वापरता येत नाही. परंतु गोंदिया विनापरवाना मोठ्या प्रमाणात देशी कट्टे वापरले जात आहेत. रेती माफियांचा वाद झाला किंवा गॅंगवार झाला यावेळी देशी कट्ट्यांचा वापर होताना दिसत आहे. गोंदिया शहरात दिवसाढवळ्या देशी कट्ट्यांची विक्री होत आहे. याचा प्रत्यय स्वत: गोंदियाच्या पोलिसांना आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून देशी कट्टा विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना रंगेहात पकडले होते. एखाद्याचे प्रेम प्रकरण असो किंवा वैमनस्य यात टोकाची भूमिका घेतलेल्या लोकांनी एकमेकांना संपविण्यासाठी देशी कट्ट्यांचा वापर केल्याच्या घटना गोंदिया जिल्ह्यात यापूर्वी घडल्या आहेत.

.............................................

मध्य प्रदेश व छत्तीसगडमधून पुरवठा

देशी कट्टा गोंदियात मध्य प्रदेश व छत्तीसगड या दोन राज्यातून होतो. बिहार आणि उत्तर प्रदेशातूनही देशी कट्टा गोंदियात येत असल्याची माहिती आहे. हे देशी कट्टे २० हजारांपासून तर लाखो रुपये किमतीला विक्री होत असल्याची माहिती आहे. या देशी कट्ट्यांच्या विक्रीला लगाम लावण्याची गरज आहे.

........................

पोलिसांनी धडक मोहीम राबवावी

अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी पोलीस यंत्रणा काम करते. दारू, जुगार व इतर अवैध धंद्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस काम करतात. मग जीवघेण्या घटना गोंदियात घडविण्यासाठी विक्री होणाऱ्या देशी कट्ट्यांच्या व्यवसायाला पोलिसांनी आळा घालण्याची गरज आहे. गोंदिया शहरात शेकडो देशी कट्टे विना परवाना वापरत आहेत. त्यांच्या घराची झडती घेण्यासाठी पोलिसांनी तत्परता दाखवून मोठ्या प्रमाणात असलेले देशी कट्टे जप्त करावेत.

.........................

आत्मसंरक्षणासाठी १८७ बंदूक

गोंदिया जिल्ह्यातील १८७ लोकांनी आत्मसंरक्षणासाठी बंदुका घेतल्या आहेत. ३३० जणांनी पीक संरक्षणासाठी बंदुका घेतल्या आहेत. बॅंकेच्या संरक्षणासाठी असलेल्या बंदुकांचाही यात समावेश आहे. जिल्हाधिकारी बंदूक परवाना देण्याची मंजुरी देतात. मंजुरीनंतरच आपल्याला बंदूक वापरता येते.

.........................

शस्त्र परवाना काढण्यासाठी करावा अर्ज

एखाद्याला आत्मसंरक्षणासाठी बंदुकीची गरज असेल तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करून त्या अर्जात शस्त्र कशासाठी पाहिजे, हे नमूद करावे लागते. हा परवाना मिळविण्यासाठी विविध कागदपत्रांबरोबर पोलिसांचे चारित्र्य प्रमाणपत्र जोडणे अत्यंत आवश्यक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला परवाना नाकारला जातो.

.....................