शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी झाला चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 05:00 IST

यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. थोडाफार पाऊस झाला ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणात रोवणी केली आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांनी रोवणी करुन २० दिवस झाले पण पाऊस नसल्याने त्यांची सुध्दा रोवणी वाळण्याच्या मार्गावर आहे.

ठळक मुद्देरोवणी खोळंबली : तिरोडा तालुक्यातील काही गावे पाण्यापासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा बुज. : तिरोडा तालुक्यात अद्यापही दमदार पावसाने हजेरी लावली नाही. पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांची रोवणी आटोपली आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाचे कुठलेच साधन नाही त्यांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली नाही. मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य ही पावसाची नक्षत्रे कोरडी गेली. थोडाफार पाऊस झाला ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांनी थोड्याफार प्रमाणात रोवणी केली आहे. तालुक्यात बहुतांश गावातील शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ज्यांनी रोवणी करुन २० दिवस झाले पण पाऊस नसल्याने त्यांची सुध्दा रोवणी वाळण्याच्या मार्गावर आहे.यावर्षी शेतकरी व शेतमजूर कोरोनाच्या संकटामुळे हवालदिल झाला आहे. तीन महिने हाताला काम नाही.यात पावसाळा लागताच शेतीच्या कामाकडे शेतकरी वळला. कर्ज काढून शेतीसाठी बियाणे खरेदी करुन पेरणी केली. धानाची रोपे आणि धानाची रोवणी करावी अशातच पावसाने दडी मारली.आठ ते दहा दिवसांपासून परिसरात पाऊस झाला नाही. त्यात धानाचे पºहे सुद्धा वाळले असून कचऱ्यांचे प्रमाण वाढले. काही ठिकाणी जवळच्या शेतकऱ्यांनी सिंचनाच्या सोईमुळे परे लावले आणि आजूबाजूचे शेत पडीक आहेत. शेतकरी आकाशाकडे दमदार पाऊस होईल आशेने दररोज आकाशाकडे नजर लावून असतो. मात्र दररोज त्याच्या पदरी निराशाच येत आहे.कुठे गरज नसताना दिले जात आहे पाणीखैरबंधा जलाशयाला लागून असलेल्या गावात शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाण्याची गंगा वाहत आहे. ज्यांची रोवणी झाली त्यांना पाण्याची गरज नसताना सुद्धा पाणी दिल्या जात आहे. शेवटच्या टोकावरील शेतकऱ्यांच्या रोवणीसाठी पाणी अजूनपर्यंत मिळाले नाही. सोनेगाव, सेजगाव, बिबीटोला, नहरटोला, डब्बेटोला, दवनीवाडा, देऊटोला, झालूटोला, कारुटोला याच भागात पाणी दिल्या जात आहे. मात्र अर्जुनी, करटी, इंदोरा बुज., परसवाडा या कालव्याला अजूनपर्यंत पाणी सोडण्यात आले नाही. खैरबंधा जलाशयाचे मुख्य अभियंता यांनी शेतकऱ्यांच्या समस्येची तातडीने दखल घेऊन रोवणीसाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. जुलै महिना संपत आला असून आॅगस्ट महिन्याला सुरूवात होणार आहे. पण अद्यापही ५० टक्के रोवणी झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.खैरबंधा जलाशयाचे पाणी केव्हा मिळणार१३ जुलैला धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्पातून खैरबंधा जलाशयात पाणी सोडण्यात आले. खैरबंधा जलाशयातून शेतकऱ्यांना रोवणी लावण्यासाठी पाणी सोडण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु जलाशयाच्या शेवटच्या टोकावरील इंदोरा बुजरुक, करटी बुज.,करटी खुर्द, बिहिरीया, बघोली, परसवाडा, खैरलांजी, अर्जुनी, सावरा, पिपरीया, गोंड मोहाळी, किंडगीपार या गावातील कालव्यात अद्यापही पाणी पोहचले नाही.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊस