शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कसायाला गाय न विकण्याची शेतकऱ्यांनी शपथ घ्यावी

By admin | Updated: February 8, 2016 01:55 IST

कृषिप्रधान भारत देशात गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. मात्र दुसरीकडे गार्इंची कत्तल करून मांस विकणे जोमाने सुरू आहे.

जवरीच्या तंमुसचे आवाहन: शासनाने गोहत्येवर बंदी घालावीगोंदिया : कृषिप्रधान भारत देशात गाईला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते. मात्र दुसरीकडे गार्इंची कत्तल करून मांस विकणे जोमाने सुरू आहे. या व्यवसायाकडे मात्र पोलीस विभाग डोळेझाक करून व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देत असल्याचा नागरिकांचा समज आहे. त्यामुळे गोहत्या होऊ देणार नाही. कसायाला गाय विकणार नाही, अशी शपथ प्रत्येक शेतकऱ्याने घ्यावी, असा निर्धार जवरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती व सरपंच ईश्वरदास पाथोडे यांनी केला आहे.जिल्ह्यातील प्रत्येक धान उत्पादक शेतकऱ्याकडे गाई-म्हशी, शेळ्या ही जनावरे आहेत. जिल्ह्यात बहुतांश आदिवासी जमातीतील लोकांकडेही गाई आहेत. ज्या गार्इंची म्हातारपणाकडे वाटचाल होते, त्यांना पैशाच्या मोहापायी अनेक शेतकरी कमी किमतीत कसायांना विकत आहेत. म्हातारी गाय मेली तर पैसेही मिळणार नाही. मग कमी किमतीत का होईना, हे गृहीत धरून त्या गाईला कसायाच्या हातात टाकतात. कसाई गार्इंना सरळ कत्तलखान्याकडे पाठवून मालामाल होत आहेत. गोहत्या करण्यावर शासनाची बंदी असली, तरीही याची अंमलबजावणी गृह विभागांतर्गत चालणाऱ्या पोलीस विभागाकडून होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.गोहत्या बंदीसाठी सर्व शेतकऱ्यांना जागरूक व्हावे अशी प्रखर भावना जवरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. गोपालकांनी त्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. गोंदिया जिल्ह्याच्या आठही तालुक्यांतून मोठ्या प्रमाणात गार्इंना कत्तलखान्यात विक्री करण्यात येते. मात्र, पोलीस क्वचितच या जनावरांना वाहून नेणारे ट्रक जप्त करतानाचे चित्र दिसून येते. या सर्व प्रकरणात बजरंग दलाचे कार्यकर्ते किंवा पोलीस एकमेकांवर नेहमीच आरोप-प्रत्यारोप करतात. मात्र, गोपालकाने आपली गाय पैशाच्या हव्यासापोटी कसायाला विकलीच नाही, तर ती गाय कत्तलखान्यात जाणारच नाही यासाठी जवरी येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीने गोहत्या बंद करावी, ही मागणी करीत कोणत्याही शेतकऱ्याने आपली गाय कसायाला विकू नये, असे आवाहन केले आहे.(तालुका प्रतिनिधी)