शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

निमगाव सोसायटीत शेतकरी पॅनलचे वर्चस्व

By admin | Updated: March 29, 2015 01:39 IST

जवळच असलेल्या निमगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चुरशीच्या ...

बोंडगावदेवी : जवळच असलेल्या निमगाव येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चुरशीच्या निवडणुकीत विलास गायकवाडा यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलने परिवर्तन पॅनलवर मात करुन आपले वर्चस्व यावेळीसुद्धा अबाधित ठेवण्यात यश मिळविले.निमगाव-बोंडगावदेवी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या १३ कार्यकारी मंडळाची निवड करण्यासाठी दि.२४ रोजी निवडणुक घेण्यात आली. गावपाळीवरील सहकार क्षेत्रातील संस्थेच्या निवडणुकीत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनल तर अंताराम तसेच रतीराम कापगते यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल सर्वशक्तिनिशी निवडणूक रिंगणात उतरले होते. दोन्ही पॅनलने सदर निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. गावच्या सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीत गावातील अनुदानप्राप्त एका खासगी शाळेचे मुख्याध्यापक असलेले राधेश्याम कापगते यांच्या शाळेमध्ये परिचर म्हणून कार्यरत असलेल्या अहिल्या राधेश्याम कापगते यांची महिला राखीव गटामधून उमेदवारी असल्याने निवडणुकीकडे गावासह परिसरातील राजकारण्यांचे लक्ष केंद्रित झाले होते. संस्थेच्या मतदारांना आपल्या बाजुने करण्यासाठी दोन्ही पॅनलच्यावतीने कोणतीही कसर ठेवल्या गेली नाही. मतदानाच्या दिवसापर्यंत गावात राजकीय वातावरण तापले दिसत होते. संस्थेचे विद्यमान अध्यक्ष विलास गायकवाड यांनी मागील पाच वर्षात संस्थेच्या प्रगतीची जाण ठेवून मतदारांनी दुसऱ्यांदा विलास गायकवाड यांच्या गळ्यामध्ये विजयपथाची माळ टाकली. त्यांच्या शेतकरी पॅनलचे विलास गायकवाड, गिरिधारी बाळबुद्धे, बळीराम बाळबुद्धे, भास्कर बांबोले, अर्जुन येसनसुरे, निवृत्ती हुकरे, प्रभुदास खोब्रागडे, लिलाधर निमजे, मंदाबाई पुस्तोडे, रतीराम कापगते यांच्या परिवर्तन पॅनलचे रतीराम कापगते, चंद्रशेखर गोबाडे, गोसाई पुस्तोडे, अहिल्या कापगते विजयी झाले. गायकवाड यांनी नऊ जागांवर विजयी मिळवून दुसऱ्यांदा आपले वर्चस्व कायम ठेवण्यात यश मिळविले, तर रतीराम कापगते यांच्या परिवर्तन पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले. खासगी शाळेत परिचर म्हणून कार्यरत असलेल्या संस्थापक मुख्याध्यापकाची पत्नी अहल्या कापगते थोड्याफार फरकाच्या मताने विजयी झाला. गायकवाड यांनी १३ पैकी ९ जागांवर विजय मिळवून आपले अस्तित्व कायम ठेवले. (वार्ताहर)