शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

थकीत रकमेसाठी शेतकऱ्याचे उपोषण

By admin | Updated: February 8, 2016 01:53 IST

येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला चार वर्षापूर्वी शतकोटी वृक्ष लागवड अंतर्गत बांधावर झाडे लावण्यासाठी कलमांचा पुरवठा करणाऱ्या ...

कृषी विभागाला पाझर फुटेना : शेतकऱ्याचा आत्महत्येचा इशारा अर्जुनी-मोरगाव : येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला चार वर्षापूर्वी शतकोटी वृक्ष लागवड अंतर्गत बांधावर झाडे लावण्यासाठी कलमांचा पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्याला लाखो रुपयांचे भुगतान झाले नाही. संबंधित कार्यालयाच्या पायऱ्या झिजवून अखेर निराश झालेल्या त्रस्त शेतकऱ्याने आपली रक्कम मिळावी यासाठी शुक्रवारपासून (दि.५) शेतामध्येच आमरण उपोषण सुरू केले आहे. विशेष म्हणजे रक्कम न मिळाल्यास येत्या दोन दिवसांत आत्महत्या करण्याचा इशाराही त्यांनी दिले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्यावतीने शतकोटी वृक्ष लागवड अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधवार विविध जातींची झाडे लावण्याची योजना चार वर्षापूर्वी राबविण्यात आली होती. झाडे लावण्यासाठी कलमांचा पुरवठा करण्याचे कंत्राट लाखांदूर तालुक्यातील आसोला येथील मंगलमूर्ती रामदास येरणे (६८) यांच्या फळरोपवाटीकेला देण्यात आला होता. तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला पुरवठा केलेल्या कलमांची रक्कम लाखोंच्या घरात आहे. पैसे मिळाले नाही म्हणून मंगलमुर्ती येरणे यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी गोंदिया व तहसीलदारांना वेळोवेळी भेटून व निवेदन देऊन पैसे देण्याची मागणी केली.मात्र कुंभकर्णी अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीकडे कानाडोळा करण्यास धन्यता माणली. अखेर आर्थिक विवंचनेत सापडलेल्या मंगलमूर्ती यांनी गावापासून ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतामध्ये अन्न त्याग करून शुक्रवारपासून (दि.५) आमरण उपोषण सुरू केले. कृषी विभागाला झाडाच्या कलमा पुरवठा करणारा शेतकरी उपोषणावर बसल्याची माहिती कळताच तालुका कृषी अधिकारी डी.एल. तुमडाम, मंडळ कृषी अधिकारी आर.के. चांदेवार यांनी आसोला येथील शेतामध्ये जावून त्यांची भेट घेतली. उपोषणाचा मार्ग सोडून चर्चेतून तोडगा काढू असे कृषी अधिकऱ्यांनी सांगूनसुध्दा मंगलमूर्ती यांनी आपला निर्णय बदललेला दिसत नाही. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याच्या निर्धारासंबंधी कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, तहसीलदार व ठाणेदार यांना शनिवारी (दि.६) कळविले. कृषी विभागाने पुरवठा झालेल्या झाडाच्या कलमांची लाखोच्या घरात असलेली रक्कम दोन दिवसात मिळाली नाही तर आपण आत्महत्या करू असा निर्धार शेतकरी मंगलमूर्ती येरणे यांनी केल्याचे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या पत्रात नमूद केले आहे. (शहर प्रतिनिधी)