शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
4
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
5
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
6
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
7
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
8
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
9
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
11
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
12
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
13
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
14
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
15
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
16
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
17
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
18
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
19
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
20
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...

कृषी महोत्सवाकडे शेतकरी फिरकेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 22:53 IST

शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहचावे, कृषी विषयक घडमोडींची माहिती त्यांना मिळावी. यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात नेमके याविरुद्ध चित्र आहे.

ठळक मुद्देस्टॉल धारकांची गैरसोय : ४० वर स्टॉल रिकामेच

आॅनलाईन लोकमतगोंदिया : शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहचावे, कृषी विषयक घडमोडींची माहिती त्यांना मिळावी. यासाठी कृषी महोत्सवाचे आयोजन केले जाते. मात्र गोंदिया जिल्ह्यात नेमके याविरुद्ध चित्र आहे. कृषी महोत्सवाची माहिती बांधापर्यंत तर सोडा शेतकऱ्यांपर्यंत पोहचलीच नसल्याने या महोत्सवाकडे शेतकरीच फिरकत नसल्याचे चित्र सोमवारी (दि.१९) तिसऱ्या दिवशी देखील कायम होते.कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने पाच दिवसीय जिल्हा कृषी व पलास महोत्सवाचे आयोजन मरारटोली परिसरातील क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. महोत्सवस्थळी शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. यासाठी कृषी अवजारे, कीटकनाशके यांच्यासह बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे स्टॉल लावण्यात आले आहे. आयोजकांनी याठिकाणी २०० स्टॉलची व्यवस्था केली. मात्र यापैकी ४० वर स्टॉल रिकामे आहेत. तर उर्वरित स्टॉलवर खाद्य साहित्य आणि सौंदर्य प्रसाधाने विक्रीचे स्टॉल आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात अनेक प्रगतीशिल शेतकरी असताना या महोत्सवात केवळ दोन तीन प्रगतीशिल शेतकºयांचे स्टॉल आढळले. कृषी महोत्सवाच्या नावाप्रमाणे या महोत्सवात कृषी विषयक माहितीचाच अभाव दिसून येत होता. त्यामुळेच या महोत्सवाकडे शेतकरी भटकत नसल्याचे चित्र आहे. तर आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची किंवा एखाद्या शेतकºयांने शेतीत केलेल्या यशस्वी प्रयोगाची माहिती महोत्सवातील एकाही स्टॉलवर शोधून सापडली नाही. त्यामुळे ज्या मोजक्या शेतकऱ्यांनी या महोत्सवाला भेट दिली त्यांचा देखील हिरमोढ झाला. विशेष म्हणजे या महोत्सवात जि.प.पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांची माहिती देण्यासाठी एक मंडप उभारण्यात आले आहे. यात केवळ तीन गायी असून बाकी मंडप रिकामे होते. एकंदरीत जेवढा खर्च आयोजकांनी महोत्सवाच्या आयोजनासाठी केली तेवढीच मेहनत महोत्सवापर्यंत शेतकरी कसे पोहचतील यासाठी न केल्याने हे कृषी महोत्सव एक प्रकारे फसल्याचे चित्र होते.दीडशे रुपये घ्या अन् मोकळे व्हाकृषी महोत्सवात स्टॉल लावलेल्या स्टॉल धारकांना जेवणासाठी आयोजकांकडून दीडशे रुपये दिले जात आहे. मात्र महोत्सव स्थळापासून खाणावळ दोन कि.मी.अंतरावर असल्याने स्टॉल धारकांसाठी गैरसोयीचे होते. एकंदरीत कृषी विभागाने दीडशे रुपये घ्या आणि तुमची व्यवस्था तुम्हीच करा असा सल्लाच अप्रत्यक्षपणे स्टॉलधारकांना दिला. एका स्टॉल धारक महिलेने जेवणासाठी गैरसोय होत असल्याचे सांगितले.जनजागृतीला मर्यादेची सीमाकृषी विभागातर्फे कृषी महोत्सवाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी यासाठी कृषी रथ तसेच कृषी विभागाचे वाहने फिरविण्यात आली. मात्र यासाठी वाहनचालकांना नेमक्या अंतरापर्यंतच जाण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले. त्यामुळे अनेक गावापर्यंत कृषी महोत्सवाची माहिती पोहचणारे रथच पोहचले नसल्याची माहिती आहे. कृषी विभागाने जनजागृतीला मर्यादा लावल्याने त्याचा फटका महोत्सवाला बसला. मात्र यात नुकसान बचत गटांच्या महिलांचे झाले.महोत्सवाला भेट देणारे सगळेच शेतकरीकृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फसलेल्या कृषी महोत्सवाचे खापर आपल्यावर फुटू नये. कृषी महोत्सवाला कशी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भेट दिली. हे दाखविण्यासाठी केवळ फेरफटका म्हणून कृषी महोत्सवाला भेट देणाऱ्याची गणणा सुध्दा शेतकरी म्हणून केली जात आहे. महोत्सवस्थळी महिला आणि पुरुषांची स्वतंत्र नोंदणी केली जाते. महोत्सवाला भेट देणाऱ्यामध्ये शहरातील नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. मात्र कृषी विभागाने शेतकऱ्यांचा आकडा फुगवून दाखविण्यासाठी त्यांची नोंद देखील शेतकरीच म्हणून करीत आहे.