शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख ९० हेक्टरमधील धानपिकावर अवकाळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 06:00 IST

जिल्ह्यातील बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान दिवाळीपूर्वी निघत असल्याने या धानाची लवकर मळणी करुन शेतकरी धान विक्रीसाठी बाजारपेठेत नेतात. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यास आणि खरीप हंगामासाठी घेतलेली उधार उसणवारी फेडण्यास मदत होते.

ठळक मुद्देअवकाळीचा मिरची पिकालाही फटका : पावसामुळे धान सडण्याच्या मार्गावर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात १ लाख ९० हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. यंदा धानाला अनुकुल असा पाऊस झाल्याने धानाची चांगली वाढ झाली.त्यामुळे धानाचे बंफर उत्पादन होण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे १ लाख ९० हजार हेक्टरमधील धानावर ओल्या दुष्काळाचे सावट निर्माण झाले.त्यामुळे शेतकरी चिंतातूर आहे.जिल्ह्यातील बरेच शेतकरी हलक्या धानाची लागवड करतात. हलका धान दिवाळीपूर्वी निघत असल्याने या धानाची लवकर मळणी करुन शेतकरी धान विक्रीसाठी बाजारपेठेत नेतात. यामुळे शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करण्यास आणि खरीप हंगामासाठी घेतलेली उधार उसणवारी फेडण्यास मदत होते.यंदा खरीपातील धान असा अनुकुल असा पाऊस आणि वातावरण मिळाल्याने धानाची चांगली वाढ झाली. त्यामुळे कृषी विभागाने सुध्दा धानाच्या हेक्टरी उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. तर जवळपास १० हजार हेक्टरमधील हलक्या धानाच्या कापणीला सुध्दा शेतकऱ्यांनी सुरूवात केली आहे. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे कापणी केलेल्या धानाच्या कळपा भिजल्या, तर काही ठिकाणी बांध्यामध्ये पाणी साचून राहिल्याने मोठ्या प्रमाणात धान सडला. परिणामी शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागला.सध्या ७० ते ८० टक्के धान कापणी योग्य झाला असून अवकाळी पावसामुळे धानाची कापणी करायची कशी असा बिकट प्रश्न शेतकºयांसमोर निर्माण झाला आहे.त्यामुळे कृषी आणि महसूल विभागाने धानाची पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई देण्याची मागणी जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी केली आहे.मिरची लागवडीवर परिणामढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे मिरचीची लागवड सुध्दा लांबणीवर पडली आहे. याचा मिरचीच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात अर्जुनी मोरगाव, देवरी, सडक अर्जुनी, गोंदिया या भागात जवळपास ४०० हेक्टरवर मिरचीची लागवड केली जाते. मात्र अवकाळी पावसामुळे यंदा मिरचीची लागवड लांबणीवर पडल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे.अवकाळी पावसाचा जिल्ह्यातील खरीप हंगामातील धानाला मोठ्या प्रमाणात फटका बसला.अनेक शेतकºयांचा तोंडी आलेला घास हिरावल्या गेला. त्यामुळे शासनाने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी.- गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य.धान पाखड होण्याची शक्यताअवकाळी पावसाचा कापणी केलेल्या धानाला फटका बसल्याने मोठ्या प्रमाणात धान पाखड झाला आहे.पाखड झालेला धान खरेदी करण्यास व्यापारी तयारी होत नाही.शासकीय धान खरेदी केंद्रावर सुध्दा या धानाला कमी दर मिळतो त्यामुळे शेतकºयांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.धानाच्या दर्जावर परिणामअवकाळी पावसाचा फटका बसल्याने धानावर काजळी चढत असून पाखड देखील होत आहे.त्यामुळे याचा धानाच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे.त्यामुळे उच्च प्रतीच्या धानाला चांगला दर मिळण्यापासून शेतकºयांना वंचित राहावे लागत आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती