अवकाळीने शेतकऱ्यांवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2020 06:00 AM2020-01-03T06:00:00+5:302020-01-03T06:00:05+5:30

हवामान विभागाने जिल्ह्यात ३१ ते ३ जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. मंगळवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे याचा रब्बी पिकांचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे.

Famine crisis on the farmers | अवकाळीने शेतकऱ्यांवर संकट

अवकाळीने शेतकऱ्यांवर संकट

Next
ठळक मुद्देकेंद्रावरील धान भिजले : धानाला फुटले अंकुर, बळीराजा संकटात, मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. गुरूवारी सकाळी सुध्दा अवकाळी पावसाने हजेरी लावली.परिणामी शासकीय धान खरेदी केंद्रावरील उघड्यावर असलेले धान भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरेदी केंद्रावर छल्ली मारून ठेवलेल्या धानाला अंकुर फुटू लागल्याने हे धान कोण घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. हरभरा, गहू, तूर या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खरीपा पाठोपाठ रब्बी हंगामाला सुध्दा मुकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.
हवामान विभागाने जिल्ह्यात ३१ ते ३ जानेवारी दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज खरा ठरला. मंगळवारपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गुरूवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील सर्वच भागात अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे याचा रब्बी पिकांचा सर्वाधिक फटका बसला आहे. तर पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानात घट झाल्याने थंडीत वाढ झाली आहे. यामुळे गुरुवारी दिवसभर गारव्यामुळे हुडहुडी कायम होती. सडक अर्जुनी, गोंदिया, आमगाव, सालेकसा तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने शेतातील बांध्यामध्ये पाणी साचले होते. त्यामुळे धान वगळता इतर कडधान्य पिकांचे मोठे नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे हरभरा आणि गहू हे दोन्ही पीक शेतकऱ्यांच्या हातून गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेला लागवड खर्च सुध्दा भरुन निघणे कठीण आहे. जिल्ह्यात यंदा ३६ हजार हेक्टरवर रब्बीची लागवड करण्यात आली आहे. यात २६ हजार हेक्टरवर धान तर १० हजार हेक्टरवर हरभरा, गहू आणि इतर पिकांची लागवड करण्यात आली आहे. अवकाळी पाऊस धानासाठी अनुकुल असला तरी इतर कडधान्य पिकांसाठी तो नुकसानकारक आहे. खरीप हंगामात परतीच्या पावसाने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे रब्बी हंगामात हे नुकसान भरुन काढू अशी अपेक्षा शेतकºयांना होती. मात्र परतीच्या पावसाने त्यावर पाणी फेरल्या गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा आर्थिक संकट ओढावले आहे.
जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनतंर्गत धान खरेदी केली जाते. सध्या या दोन्ही विभागाच्या धान खरेदी केंद्रावर धानाची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.आदिवासी विकास महामंडळाकडे गोदामे नसल्याने त्यांचा धान उघड्यावर असतो. तर जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर आवक अधिक असल्याने शेतकऱ्यांचा धानाचा पंधरा पंधरा दिवस काटा होत नसल्याने हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. दरम्यान या धानाला अवकाळी पावसाचा फटका बसल्याने काही धानाला अंकुर सुध्दा फुटल्याने तो धान खरेदी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर जोपर्यंत धानाचा काटा होत नाही तोपर्यंत त्या धानाची जवाबदारी ही शेतकऱ्यांची असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे दोन्हीकडून शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे.

हरभरा, गव्हाचे सर्वाधिक नुकसान
जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी तूर, हरभरा, लाखोळी, वटाणा, करडई, भूईमूंग आदी कडधान्य युक्त पिकांची लागवड करतात. मात्र ढगाळ वातावरण व अवकाळी पावसामुळे किडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे गहू आणि हरभऱ्याचे सर्वाधिक नुकसान झाले.बहरात असलेल्या तूर पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव झाला असून हे पीक अधिक प्रभावित होण्याची शक्यता आहे.

Web Title: Famine crisis on the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस