शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

इटियाडोह धरणाचा कालवा फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 05:00 IST

इटियाडोह धरणापासून हे अंतर सुमारे ८ किमी. आहे. रविवारी (दि.२२) सर्वत्र ‘जनता कर्फ्यू’ होता. त्यामुळे लोक रविवारी बाहेर पडले नाही. त्यामुळे ही माहिती रविवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजतादरम्यान कळली. लगेच गोठणगाव-इटियाडोह शाखा कार्यालयातील कर्मचारी व पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी त्या स्थळावर पोहचले. तात्पुरती डागडुजी केल्यानंतर धरणातून सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले.

ठळक मुद्देचिचोली नवीन ते तिबेटकॅम्प दरम्यान : रविवार सायंकाळची घटना

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : इटियाडोह धरणाचा मुख्य कालवा चिचोली नवीन ते तिबेटकॅम्प दरम्यान रविवारी (दि.२२) फुटला. या कालव्याच्या पाळीवर असलेल्या रस्त्याच्या खालच्या भागाला भगदाड पडले आहे. याद्वारे कालव्यातून वाहणारे बरेच पाणी वाया गेले. कालवा फुटलेल्या ठिकाणी डागडुजी करण्यात आली असून वाहणारे पाणी बंद करण्यात आल्याचे पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष कांबळे यांनी सांगितले.इटियाडोह धरणापासून हे अंतर सुमारे ८ किमी. आहे. रविवारी (दि.२२) सर्वत्र ‘जनता कर्फ्यू’ होता. त्यामुळे लोक रविवारी बाहेर पडले नाही. त्यामुळे ही माहिती रविवारी सायंकाळी सुमारे ५.३० वाजतादरम्यान कळली. लगेच गोठणगाव-इटियाडोह शाखा कार्यालयातील कर्मचारी व पाणी वापर संस्थेचे पदाधिकारी त्या स्थळावर पोहचले. तात्पुरती डागडुजी केल्यानंतर धरणातून सोडले जाणारे पाणी बंद करण्यात आले. सिंचनासाठी धरणाचे पाणी देण्याची १० दिवसांची खेप असते. ही खेप सोमवारी (दि.२३) संपणार असल्याने रविवारी (दि.२२) सायंकाळी ६ वाजता पाणी बंद केले जाणार होते. मात्र तत्पूर्वीच कालवा फुटल्याचे कळले असे उप विभागीय अभियंता भिवगडे यांनी सांगितले.इटियाडोह धरणाचे कालवे अनेकदा फुटतात. ते जीर्ण झाले आहेत. याकडे शासनाचे दुर्लक्ष आहे. यासाठी निधीच उपलब्ध करून दिला जात नाही. कालव्यात गाळ साचला आहे. धरणाच्या निर्मितीनंतर गाळ उपसा झालाच नाही. त्यामुळे पाणी वाहून जाण्याची क्षमता कमी झाली आहे. आधीपासून नियोजित असलेले पूर्ण क्षमतेचे पाणी कालव्यातून सोडल्यास कालवा फुटण्याची भीती असते. तर कमी पाणी सोडल्यास शेवटच्या टोकावर पूर्ण क्षमतेने पाणी पोहचत नसल्याची शेतकऱ्यांची ओरड होते. इटियाडोह धरणाच्या कालव्याचे सिमेंट अस्तरीकरण करणे महत्वाचे आहे.