जिल्ह्यातील इंग्रजीच्या तज्ज्ञांचा मुंबईत सत्कार

By Admin | Updated: February 4, 2016 02:00 IST2016-02-04T02:00:06+5:302016-02-04T02:00:06+5:30

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व ब्रिटिश कॉन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने सत्र २०१३ पासून वर्ग नववी व दहावी ...

English experts in the district are honored in Mumbai | जिल्ह्यातील इंग्रजीच्या तज्ज्ञांचा मुंबईत सत्कार

जिल्ह्यातील इंग्रजीच्या तज्ज्ञांचा मुंबईत सत्कार

सडक अर्जुनी : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व ब्रिटिश कॉन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने सत्र २०१३ पासून वर्ग नववी व दहावी इंग्रजी शिक्षकांचे राज्यभर पाच दिवसांचे प्रशिक्षण घेण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य करणाऱ्या सहा शिक्षकांचा उत्कृष्ट कार्याबद्दल व सत्र २०१५-१६ मध्ये मास्टर ट्रेनर्स म्हणून कार्य केल्याबद्दल रविवारी सत्कार करण्यात आला.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भार्इंदर ठाणे येथे इव्हेंट/सिम्पोसिझम कार्यक्रमात सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यात गिरधारी पारधी (फुलचूर हायस्कूल फुलचूर), योगेंद्र चुटे (रामकृष्ण विद्यालय, कुऱ्हाडी), विलास सोनवाने (सरस्वती विद्यालय, बनगाव), दिलीप मून (एआयपी विद्यालय, रिसामा), अनिल मेश्राम (जि.प. हायस्कूल, सडक-अर्जुनी), खिलेंद्र लांजेवार (मनोहरभाई पटेल मिल्ट्री स्कूल, गोंदिया) यांचा समावेश आहे. याप्रसंगी राज्य शिक्षण विभागाचे मुख्य सचिव नंदकुमार, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचे मुख्य समन्वयक निवास शास्त्री, प्रकल्प व्यवस्थापक गौरी पुराणिक, रंजित देशमुख, शौरॉन मेमीस, डॉ. सुवर्णा खरात, सिमन बार्ग, अमोल पडवाड आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: English experts in the district are honored in Mumbai