शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
2
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
3
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
4
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
5
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
6
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
7
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
8
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
9
वैभव सूर्यवंशीला बाद केल्यावर केलं असं सेलिब्रेशन, अडचणीत सापडला जेमिसन, BCCIने सुनावली अशी शिक्षा  
10
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
11
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
12
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
13
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
14
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
15
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
16
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
17
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
18
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
19
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
20
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर इलेक्शन फिव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 06:00 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकीय बदलामुळे चारही विधानसभा क्षेत्रात इच्छुक उमेदवारांना ‘इलेक्शन फिव्हर’ चढल्याचे चित्र आहे. अद्याप कोणत्याच पक्षातून प्रबळ उमेदवारांची दावेदारी नसली तरी अनेक नवशे गवशे उमेदवार स्वत:ला भावी आमदार समजू लागले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात ज्याप्रमाणे व्हायरल फिव्हरची साथ सुरु आहे. त्याचप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या राजकीय बदलामुळे चारही विधानसभा क्षेत्रात इच्छुक उमेदवारांना ‘इलेक्शन फिव्हर’ चढल्याचे चित्र आहे. अद्याप कोणत्याच पक्षातून प्रबळ उमेदवारांची दावेदारी नसली तरी अनेक नवशे गवशे उमेदवार स्वत:ला भावी आमदार समजू लागले आहेत. त्याच अविर्भावात मतदारांशी संवादही करु लागले आहेत. या उमेदवारांचे समर्थक सोशल मीडियावर आपल्याच उमेदवाराला तिकिट मिळणार असा दावा करुन मोकळे होत आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पक्षांच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती जिल्ह्यात ठिकाणी घेतल्या जात आहेत. अनेक इच्छुक उमेदवार धार्मिक कार्यक्रम, महापुरुषांच्या जयंत्या, आरोग्य शिबिर आदी कार्यक्रमाच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधत आहेत.उमेदवारांसाठी सर्वच पक्षात नवशा गवशांची रांग लागली आहे. कोणत्या विधानसभेत कोणाला तिकिट मिळणार यावर खलबते सुरु आहेत. अनेकजण तर ए.बी.फार्म मिळाल्याप्रमाणे चमकोगिरी करण्यात धूंद आहेत.पक्ष या वेळी कोणत्या आधारावर कुणाला उमेदवारी देणार हे कळायला मार्ग नाही. मात्र इच्छुकांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर प्रचाराला सुरुवात झाली आहे. काही समर्थकांनी उमेदवारांच्या नावाने फेसबुकवर पेजेस तयार केले आहेत. त्यावर त्यांच्या दररोजच्या कार्यक्रमाची, दौऱ्याचा अगदी प्रचार सुरु असल्याप्रमाणे इत्यंभूत माहिती टाकली जात आहे. आता नेमका कुणाचा दावा खरा ठरणार आहे? आणि कोणता उमेदवार तिकिटाकरिता पात्र ठरणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक