शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष पथकाने पकडली आठ हजारांची दारू

By admin | Updated: January 25, 2015 23:17 IST

विशेष पथकाने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तांडा येथे धाड घालून दारू संबंधात घरझडती घेतली. यात दोन आरोपींकडे एकूण ८ हजार ४६० रूपयांची देशी व इंग्रजी

गोंदिया : विशेष पथकाने गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या तांडा येथे धाड घालून दारू संबंधात घरझडती घेतली. यात दोन आरोपींकडे एकूण ८ हजार ४६० रूपयांची देशी व इंग्रजी दारू अवैधरित्या साठवून ठेवलेली आढळली.तांडा येथील रहिवासी संतोष भरत पटेरिया (३७) याने आपल्या जनरल स्टोर्स दुकानात एका प्लास्टिकच्या पिशवीत ४८ देशी दारूचे पव्वे व ३८ चिता नामक देशी दारूचे पव्वे अशी एकूण चार हजार ३०० रूपयांची दारू अवैधरित्या साठवून ठेवली होती. विशेष पथकाचे पोलीस हवालदार कवलपालसिंह भाटिया यांनी धाड घालून सदर दारू जप्त केली. ही कारवाई शनिवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात आली. पोलीस हवालदार भाटिया यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), ७७ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला. तपास पोलीस हवालदार तिवारी करीत आहेत. दुसऱ्या घटनेत विशेष पथकाचे पोलीस हवालदार टेंभुर्णे यांनी तांडा येथील एका पानठेल्याची दारू संबंधात झडती घेतली. पानठेल्यात त्यांना चार हजार १६० रूपये किंमतीचे देशी व इंग्रजी दारूचे एकूण ८० पव्वे अवैधरित्या साठविलेले आढळले. ही कारवाई शनिवारी २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.४५ वाजता करण्यात आली. प्रवीण यशवंत डोंगरे (२२) व उत्तम मोहन खांडेकर (४२) दोन्ही रा. तांडा अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी उत्तम खांडेकर फरार आहे. पोलीस हवालदार टेंभुर्णे यांच्या तक्रारीवरून ग्रामीण पोलिसांनी मुंबई दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई), ७७ (अ) अन्वये गुन्हा नोंद केला. तपास पोलीस हवालदार आडे करीत आहेत. (प्रतिनिधी)