शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
3
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
4
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
5
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
6
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
7
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
8
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
9
Manisha Padhi : स्क्वॉड्रन लीडर मनीषा पाढी यांची ऐतिहासिक झेप; राज्यपालांच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी
10
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
11
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
12
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
13
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
14
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
15
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
16
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
17
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
18
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
19
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
20
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
Daily Top 2Weekly Top 5

आठ धार्मिक स्थळे वांद्यात

By admin | Updated: October 29, 2015 00:18 IST

अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळांची विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे.

गोंदिया : अतिक्रमण करून उभारण्यात आलेल्या धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याच्या उद्देशाने शासनाकडून अनधिकृत धार्मिक स्थळांची विशेष शोधमोहीम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गोंदिया शहरातील आठ धार्मिक स्थळांचा शोध घेऊन पालिका प्रशासनाने त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे. सन २००९ पूर्वीची ही स्थळे असल्याने आता नियमितीकरणाची गरज दिसून येत आहे. मात्र याबाबत समितीच बैठकीत निर्णय घेणार आहे.मोकळी जागा मिळेल तेथे धार्मिक स्थळ उभारून अतिक्रमण करण्याचे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र शासकीय जागा असल्यास त्या जागेसाठी असलेले शासनाचे प्रयोजन कोलमडते. शिवाय खाजगी जागा असल्यास एखाद्याची संपत्ती हिरावली जाते. अतिक्रमणाच्या या वाढत्या प्रकारांमुळे धार्मिकस्थळांचे प्रमाणही झपाट्याने वाढत चालले आहेत. बघावे त्याला धार्मिकस्थळांसाठी जागा काबीज करण्याचे प्रकार सर्वत्र दिसून येत आहेत. या प्रकारावर आळा बसावा व अतिक्रमण करून करण्यात आलेल्या धार्मिकस्थळांवर कारवाई करून अतिक्रमण केलेली जागा मोकळी करावी या उद्देशातून शासनाने अनधिकृत धार्मिक स्थळांसाठी विशेष मोहीम छेडली आहे. अतिक्रमण केलेली जागा मोकळी व्हावी हा या मोहिमेचा उद्दीष्ट असला तरीही, कुणाची धार्मिक भावना दुखावू नये, तसेच या धार्मिक स्थळांमुळे नागरिकांना त्रास होऊ नये या दोन्ही बाजूंना सावरत शासन ही मोहीम राबविणार आहे. फेब्रुवारी २०१५ पासून शासनस्तरावर या मोहिमेचे कार्य सुरू आहे. याअंतर्गत तालुकास्तरावरून कारवाई केली जात असतानाच शहरातील धार्मिक स्थळांची जबाबदारी मात्र नगर परिषदेवर देण्यात आली आहे. त्यानुसार नगर परिषदेकडून शहरातील अशा धार्मिक स्थळांचा शोध घेऊन त्यांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)