शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

विनयभंग प्रकरणातील आरोपींना शिक्षा

By admin | Updated: March 18, 2017 01:45 IST

सालेकसा व गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत विनयभंगाच्या दोन प्रकरणातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने

गोंदिया : सालेकसा व गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत विनयभंगाच्या दोन प्रकरणातील आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने एका प्रकरणात तीन वर्षाचा तर दुसऱ्या प्रकरणात पाच वर्षाचा कारावास ठोठावला. प्राप्त माहितीनुसार, गोरेगाव तालुक्याच्या पाथरी/कुऱ्हाडी येथील मंगेश सुरेश टेंभूर्णीकर (२५) याने त्याच्या घराच्या बांधकामावर मजुरीसाठी येणाऱ्या २८ वर्षाच्या महिलेचा २० जून २०१४ रोजी सकाळी ११ वाजता विनयभंग केला. या प्रकरणावर बुधवारी न्यायाधीश एस.आर.त्रिवेदी यांनी सुनावणी केली. या प्रकरणातील आरोपी मंगेशला तीन वर्षाचा सश्रम कारावास व तीन हजार रूपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन महिन्यांचा कारावास सुनावला आहे. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. महेश चांदवानी यांनी काम पाहीले. न्यायालयीन कामकाजासाठी महिला पोलीस हवालदार सुधा गणवीर, आशा मेश्राम व इतर कर्मचाऱ्यांनी केली. दुसऱ्या प्रकरणात सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या कवडी येथील आरोपी कारू गोविंदा टेंभूर्णीकर (५०) याला पाच वर्षाचा सश्रम कारावास व व अडीच हजार रूपये दंड ठोठावला आहे. सदर सुनावणी गुरूवारी जिल्हा सत्र न्यायाधीश क्र.२ माधुरी आनंद यांनी केली आहे. ४ जुलै २०१५ च्या दुपारी शेजारच्या ५ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. घटनेच्या वेळी पिडीत मुलीचे वडील तेथे पोहचल्याने त्या ठिकाणाहून आरोपी पसार झाला. सालेकसा पोलिसांनी या संदर्भात भादंविच्या कलम ३५४ ब, ८, १२ बाल लैंगिक अत्याचार अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात कलम ३५४ ब अंतर्गत ५ वर्षाचा सश्रम कारावास, कलम ८ अंतर्गत पाच वर्षाचा कारावास, कलम १२ अंतर्गत ३ वर्षाचा कारावास व अडीच हजाराचा दंड ठोठावला आहे. सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.मेघा रहांगडाले यांनी काम पाहीले. (तालुका प्रतिनिधी)