शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

शिक्षकांची एकस्तर वेतन श्रेणी अंतिम सुनावणी होईपर्यंत बंद करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 5:00 AM

जिल्हा सन १९९० पासून आदिवासी उपाययोजनात,  तसेच २००४-५ पासून नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक ६ ऑगस्ट २००२ नुसार एकस्तर वेतन श्रेणीचा अधिकचा लाभ देण्यात यावा. प्रोत्साहन भत्ता म्हणून सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के अथवा जास्तीत जास्त पंधराशे रुपये करण्यात यावा, असा निर्णय आहे; पण जि.प. गोंदिया येथे कोणत्याही कर्मचाऱ्याला बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्याची एकस्तर वेतन श्रेणी बंद करण्यात येते.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ५४१ याचिकाकर्त्या शिक्षकांची एकस्तर वेतन श्रेणी कार्यरत असेपर्यंत बंद करण्यात येऊ नये यासाठी शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. यावर उच्च न्यायालयाने या प्रकरणाची अंतिम सुनावणी होईपर्यंत एकस्तर वेतन श्रेणी बंद करू नये, असे निर्देश जिल्हा परिषद, गोंदिया व शासनाला दिले आहे. जिल्हा सन १९९० पासून आदिवासी उपाययोजनात,  तसेच २००४-५ पासून नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित आहे. आदिवासी व नक्षलग्रस्त भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक ६ ऑगस्ट २००२ नुसार एकस्तर वेतन श्रेणीचा अधिकचा लाभ देण्यात यावा. प्रोत्साहन भत्ता म्हणून सहाव्या व सातव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के अथवा जास्तीत जास्त पंधराशे रुपये करण्यात यावा, असा निर्णय आहे; पण जि.प. गोंदिया येथे कोणत्याही कर्मचाऱ्याला बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच त्याची एकस्तर वेतन श्रेणी बंद करण्यात येते. शासन निर्णयानुसार प्रचलित मूळ वेतनाच्या १५ टक्के किंवा पंधराशे रुपये लाभ देण्यात येत नाही.त्यामुळे ५४१ शिक्षक  हे आपल्या न्याय्य मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २२ नोव्हेंबरला सुनावणी करीत असताना न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत याचिकाकर्त्या शिक्षकांची एकस्तर  वेतन श्रेणी बंद करू नये, तसेच शासानाने आपली बाजू चार आठवड्यांच्या आत न्यायालयासमोर मांडावी, असे निर्देश न्यायमूर्ती सुनील शुक्रे व न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी दिला. 

यासाठी दाखल केली होती याचिका nजि.प. गोंदियांतर्गत सर्व तालुके हे नक्षलग्रस्त क्षेत्र म्हणून गृहमंत्रालयाकडून २००४-५ पासून घोषित आहेत. नक्षलग्रस्त क्षेत्रांमध्ये काम करीत असताना शिक्षकांसह सर्व कर्मचाऱ्यांना जोखीम पत्करावी लागते. त्यामुळे शासन निर्णयानुसार त्यांना एकस्तर वेतन श्रेणीचा अधिक लाभ देण्यात येतो, तसेच प्रोत्साहन भत्ता म्हणून प्रचलित वेतन आयोगानुसार त्याच्या मूळ वेतनाच्या १५ टक्के किंवा जास्तीत जास्त पंधराशे रुपये देण्यात यावा, असा उल्लेख शासन निर्णयात  आहे; पण जि.प. गोंदिया येथे कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात येत नाही. सातवा वेतन आयोग लागू होऊनसुद्धा शिक्षकांना पाचव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतनाच्या पंधरा टक्के प्रोत्साहन भत्ता म्हणून दिला जातो. सातव्या वेतन आयोगानुसार प्रोत्साहन् भत्ता मिळत नाही. त्यामुळे अनेक शिक्षकांवर अन्याय झालेला आहे, तसेच शासन निर्णयाचीसुद्धा पायमल्ली होत आहे. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील अनेक शिक्षक संघटना एकत्रित येऊन त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.यांनी केली होती याचिका दाखल nयाचिकाकर्त्यांमध्ये सुरेंद्र गौतम, संध्या पारधी (अंबुले), दयाशंकर वाढई, संदीप मेश्राम, तिष्यकुमार भेलावे, महेंद्र रहांगडाले, सुजित बोरकर, चंद्रभान दशमेर, विजय पारधी, आशिष कापगते, विक्रमसिंग ठाकूर, अशोक बिसेन, नोकलाल शरणागत, टी.के. बोपचे, संतोष पारधी, शैलेंद्र कोचे, विवेक बिसेन, सतीश दमाहे, ओमप्रकाश घरत, संतोष बिसेन, टेकाडे, रवी काशीवार, लाखेश्वर लंजे, संचित वाळवे, कैलास हांडगे, राजेश मरघडे, नरेंद्र बनकर, देव झलके यांच्यासह ५४१ शिक्षकांचा समावेश आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदEducationशिक्षण