शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना वेळेचे भान नाही

By admin | Updated: May 3, 2017 01:00 IST

ग्रामीण रूग्णालयात कार्यरत डॉक्टरांना ठरवून दिलेल्या वेळेचे भान पाळून रूग्णांना सेवा देणे बंधनकारक व अपेक्षित आहे.

ग्रामीण रूगाणालयातील प्रकार :नागरिकांकडून कारवाईची मागणी सौंदड : ग्रामीण रूग्णालयात कार्यरत डॉक्टरांना ठरवून दिलेल्या वेळेचे भान पाळून रूग्णांना सेवा देणे बंधनकारक व अपेक्षित आहे. मात्र येथील ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर आपल्या मर्जीने रूग्णालयात ये-जा करतात. यामुळे मात्र रूग्णांना सकाळपासून रूग्णालयात आपला नंबर लावून ताटकळत बसावे लागत आहे. या प्रकाराकडे लक्ष देत जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी नागरीक करीत आहेत. बदलत्या वातावरणामुळे आरोग्यावर त्याचा परिणाम होत आजाराचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे सकाळपासूनच नागरीक उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात गर्दी करीत आहेत. आपला नंबर लवकर लागावा यासाठी रूग्ण सकाळपासूनच रूग्णालयात रांगा लावत आहेत. रूग्णालयात डॉक्टरांची वेळ सकाळी ८ ते रात्री ८ वाजतापर्यंतची आहे. तशी पाटीही रूग्णालयात लावण्यात आली आहे. मात्र येथे कार्यरत डॉक्टर गिरीश कापगते आपल्या मर्जीने येतात. विशेष म्हणजे, रूग्णालयातील डॉक्टर्सचे पद रिक्त असल्याने त्यांच्यावरच कामाचा बोजा आला आहे. शिवाय ते कंत्राटी त्तवावर काम करीत असून बाहेरगावाहून येतात. यामुळे ते वेळेचे बंधन पाळत नाही व यामुळे मात्र नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर रूग्णालयातील कर्मचारीही रूग्णांशी अरेरावीच्या भाषेत वागत असल्याचेही बोलले जात आहे. डॉक्टर वेळेवर येत नसल्याने कित्येकांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करावा लागत आहे. रूग्णालयात डॉक्टर नाहीत, पुरेसा औषधसाठा नाही, कर्मचाऱ्यांची अरेरावी यासर्व प्रकारांमुळे येथील रूग्णालय रूग्णांना सेवा देण्यात कुचकामी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या प्रकारांकडे लक्ष देत जनप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी संबंधीतांवर कारवाई करावी अशी मागणी भूपेंद्र साखरे, अंकूर राऊत, केवळराम इरले, जोधरू टेंभूर्णे, ज्योती टेंभूर्णे, भास्कर डोंगरवार, संतोष बनकर, चून्नीलाल साखरे, कैलाश ठाकरे, शुभांगी इरले, हंसा राऊत, मंगेश सुर्यवंशी, घनश्याम पातोडे, परसराम कुरसूंगे, राजरत्न मेश्राम, अभिमन्यू उप्रीकर, रमेश नगरकर, रामलाल तरोणे यांच्यासह नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)