शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

कचरा जाळून लावली जाते विल्हेवाट

By admin | Updated: January 25, 2015 23:17 IST

शहर कचऱ्याने माखलेले आहे. कचरा उचलून न्यावा तेवढाच वाढत चालला आहे. यावर सफाई कामगारांनी शॉर्टकट उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे कचरा जागेवरच जाळून त्याची

गोंदिया : शहर कचऱ्याने माखलेले आहे. कचरा उचलून न्यावा तेवढाच वाढत चालला आहे. यावर सफाई कामगारांनी शॉर्टकट उपाय शोधून काढला आहे. तो म्हणजे कचरा जागेवरच जाळून त्याची विल्हेवाट लावण्याचा. येथील बीजीडब्ल्यु रूग्णालयासमोर रविवारी (दि.२५) हा प्रकार दिसून आला. यातून कचरा जळून खाक होत असला तरी त्यातून निघणाऱ्या धुरामुळे मात्र वातावरणात प्रदूषण होत आहे. स्वच्छतेच्या मुद्याला घेऊन नगर परिषद नेहमीच चर्चेत राहते. वास्तवीक शहराला कचऱ्याने विळखा घातला आहे यात काही दुमत नाही. बघावे तेथे कचऱ्याचे ढिगार नजरेत पडतात. सफाई कामगारांकडून कचऱ्याची उचल करण्यात आली की लगेच तेवढाच कचरा पुन्हा दिसून येतो. एकंदर कचऱ्याची समस्या ही नेहमीचीच झाली आहे. येथील बीजीडब्ल्यु रूग्णालयासमोर मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. त्यामुळे या मार्गावर ये-जा करताना दुर्गंधीचाही सामना करावा लागतो. रविवारी (दि.२५) सफाई कामगारांकडून येथील कचऱ्याची उचल केली जात होती. यासाठी ट्रॅक्टर लावण्यात आला होता. मात्र कचऱ्याची उचल कमी केली जात असून कागमार कचरा तेथेच जाळत असल्याचे दिसून आले. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा हा शॉर्टकट मार्ग कामगारांनी शोधून काढल्याचे दिसले. विशेष म्हणजे हा प्रकार नवा नाही. हा प्रकार केला जात असताना कचरा नष्ट होतो. मात्र त्यातून निघणारा धूर वातावरण व मानवी आरोग्यासाठी हानीकारक असतो. अशात हा कितपत योग्य आहे हे सांगणे कठीण आहे. (शहर प्रतिनिधी)