शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपत्ती असूनही सिंचनासाठी आसुसलेला

By admin | Updated: April 24, 2015 01:40 IST

भंडारा जिल्ह्यातून विभाजन झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात १७४८ मामा तलाव अस्तित्वात होते.

कपिल केकत गोंदियाभंडारा जिल्ह्यातून विभाजन झाल्यानंतर गोंदिया जिल्ह्यात १७४८ मामा तलाव अस्तित्वात होते. जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाने मात्र प्रत्यक्षात किती मामा तलाव जिल्ह्यात आले याची माहिती घेतली. त्यात १४२१ मामा तलाव प्रत्यक्षात असल्याची महिती आहे. एवढ्या मोठ्या संख्येत एखाद्या जिल्ह्यात मामा तलाव असणे साधारण बाब नसून यामुळेच १४२१ मामा तलाव असलेला गोंदिया हा ‘धनी’ जिल्हा म्हणून ओळखला जातो. तलाव असले तरी योग्य त्या देखभाल दुरूस्तीअभावी यातील काही तलावांना अखेरची घरघर लागली आहे. मानवाला त्याच्या दैनंदिन उपयोगाशिवाय शेतीसाठी या मामा तलावांचा उपयोग होतो. विशेष म्हणजे भूगर्भातील जलस्तर वाढविण्यासाठी या मामा तलावांची उपयोगीता असून जल संपत्तीचे संग्रहण करण्याचे हे एक महत्वपूर्ण साधन आहे. मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी उपाययोजना आज मामा तलावांच्या दुरूस्तीसाठी एमआरईजीएस अंतर्गत गाळ काढण्यासारखे काम केले जात आहेत. मात्र पाहिजे त्या प्रमाणात ही कामे होत नसल्याचीही वास्तवीकता आहे. याकरिता विभागाने शासनाकडे तलावांच्या दुरूस्तीसाठी विशेष निधीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मामा तलावांचा हा मुद्दा लक्षात घेत शासनाने मधूकर किंमतकर यांच्या अध्यक्षतेत दोन-तीन वर्षांपूर्वी समिती गठीत केली होती. समितीने विदर्भातील मामा तलावांचा सखोल अभ्यास करून सुमारे शिफारसी शासनाकडे केल्या आहेत. याशिवाय जल संपत्ती वाढविण्यासाठी शासनाचे जलयुक्त शिवार अभियान प्रभावी ठरणार आहे. सुमारे ३००-३५० वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी भविष्यातील पाणी टंचाईचे आकलन करून मामा तलाव तयार केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच गोंदिया व भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. पूर्वजांच्या पुण्याचे फलीत आजच्या पिढीला चाखायला मिळत असून त्यांच्या पुण्याईनेच जिल्ह्यात पाणी टंचाई होत नाही. मात्र आजच्या पिढीला या जल संपत्तीचा अपव्यय टाळून जास्तीत जास्त सिंचन करण्याची गरज आहे. असे न झाल्यास येणारी पिढी मात्र पाण्यासाठी तडपणार यात शंका नाही. जल संपत्ती हीच खरी संपत्ती असून या संपत्तीचे वेळीच जतन करणे गरजेचे आहे.