शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधीचा निधी असूनही नियोजन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 02:05 IST

सर्वसामान्य आणि दलितांच्या कल्याणासाठी समाजकल्याण विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. पण जिल्हा परिषदेत स्थायी समाजकल्याण अधिकारी नसल्यामुळे ...

अधिकारी द्या : जि.प.त समाजाचे अकल्याणगोंदिया : सर्वसामान्य आणि दलितांच्या कल्याणासाठी समाजकल्याण विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. पण जिल्हा परिषदेत स्थायी समाजकल्याण अधिकारी नसल्यामुळे अनेक योजना रखडल्या आहेत. त्यामुळे निधी असूनही कामांचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे हजारो लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहात आहेत.अनेक योजनांसाठी निधी नसल्यामुळे लाभार्थ्यांना निधीची वाट पाहात ताटकळत राहावे लागते. मात्र समाजकल्याण विभागात भरपूर निधी असूनही त्याचा लाभ लाभार्थ्यांना देणे कठीण झाले आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागात सध्या कोणाचा पायपोस कोणात नाही. कनिष्ठ कर्मचाऱ्याकडे अधिकाऱ्याचा प्रभार देऊन कारभार चालविला जात आहे.ग्रामीण भागातील सामाजिक उत्थानासाठी ज्या निधीचे वाटप होणे गरजेचे आहे ते वाटप अनेक गावांना झालेले नाही. योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी देताना त्याचा प्राधान्यक्रम शासनाने ठरवून दिला आहे. त्यानुसार ज्या वस्त्यांना अद्याप लाभ देणे बाकी आहे अशा वस्त्या, प्रथम लाभ दिला अशा वस्त्या, जास्तीचा लाभ देणे बाकी आहे अशा वस्त्या, आणि नंतर दोनदा लाभ दिला अशा वस्त्या, अशा पद्धतीने लाभ देणे गरजेचे आहे. मात्र प्रत्यक्षात नियमानुसार लाभ न देताना सर्वजण आपल्या पोळ्या भाजत आहेत. यामुळेच जि.प.सदस्य मनोज डोंगरे यांना जनहित याचिका लावण्याची वेळ आली आहे.दलितांसाठीच्या योजनांचा लाभ मिळण्यापासून त्यांनाच वंचित ठेवण्याचा हा प्रकार बंद करावा आणि जिल्हा परिषदेला पूर्णवेळ स्थायी जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्याची नियुक्ती सामाजिक न्यायमंत्र्यांनी करावी, अशी मागणी दलित कार्यकर्ते राधेश्याम गजभिये यांनी केली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)