शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टर असूनही देशसेवेसाठी तत्पर ; शपथ घेताच काळाने हिरावलं : सौम्य असाटींचं दुर्दैवी निधन

By नरेश रहिले | Updated: June 16, 2025 19:20 IST

नौदलात होते कार्यरत : विशाखापट्टणम येथे रस्ते अपघातात ठार

आमगाव : येथील लेफ्टनंट नेव्ही ऑफिसर सौम्य असाटी यांचा विशाखापट्टणम येथे १४ जून रोजी रस्ते अपघातात मृत्यू झाला. सोमवारी (दि. १६) त्यांचे पार्थिव आमगाव येथे आणण्यात आले. हजारो नागरिकांच्या उपस्थितीत व शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आमगाव शहर बंद ठेवून सौम्य असाटी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

सौम्य असाटी यांनी २०२३-२४ मध्ये आर्मी फोर्स मेडिकल महाविद्यालयातून ९ वा क्रमांक प्राप्त करीत एमबीबीएसची परीक्षा उत्तीर्ण केली. इतर कुठेही डॉक्टरची सेवा न देता देशसेवा करण्याच्या हेतूने मे २०२४ ला विशाखापट्टणम येथे पहिली पोस्टिंग सर्जन सब लेफ्टनंट नेव्ही ऑफिसर म्हणून ते रुजू झाले होते. आमगाव शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच कुणी तरुण नेव्हीमध्ये सर्जन सब लेफ्टनंट नेव्ही ऑफिसर म्हणून नियुक्त झाला होता. यामुळे आमगाव शहराच्या शिरपेचात मानाच्या तुरा रोवला गेला होता. विशाखापट्टणम येथे कर्तव्यावर असताना शनिवारी (दि. १४) सौम्य असाटी व मैत्रीण मेघा रावत हे दोघे दुचाकीने जात असताना हॉर्बर पोलिस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील विझाग सिटीजवळ ट्रकने धडक दिली. यात डॉ. सौम्य असाटी व डॉ. मेघा रावत या दोघांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच आमगावसह जिल्ह्यात शोककळा पसरली. डॉ. सौम्य असाटी यांचे पार्थिव १६ जून रोजी आमगाव येथे आणण्यात आले. यानंतर त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

यांची होती उपस्थिती

या वेळी उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड, तहसीलदार मोनिका कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मडामे, पोलिस निरीक्षक तिरुपती राणे, केशव मानकर, नरेश माहेश्वरी, रमेश होतीलाल, संभूदयाल अग्रीका, वडील सतीश असाठी, महेश उके, गोविंद असाटी, वसंत मेहता उपस्थित होते.

टॅग्स :gondiya-acगोंदियाamgaon-acआमगाव