शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

उपशिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली ‘तिच्या’ शिक्षणाची जबाबदारी

By admin | Updated: January 22, 2017 00:58 IST

ऐन खेळण्या-बाळगण्याच्या वयामध्ये जन्मदात्या मायबापांचे कृपाछत्र एकाएकी हिरावून गेल्याने स्रेहा (१४) व विराज (८) या दोन भावंडाना अनाथ होण्याची पाळी आली.

लोकमतचा पाठपुरावा : अनेकांकडून मदतीचा ओघ अमरचंद ठवरे  बोंडगावदेवी ऐन खेळण्या-बाळगण्याच्या वयामध्ये जन्मदात्या मायबापांचे कृपाछत्र एकाएकी हिरावून गेल्याने स्रेहा (१४) व विराज (८) या दोन भावंडाना अनाथ होण्याची पाळी आली. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी- चान्ना येथील अनाथ झालेल्या त्या दोघा भावंडाना समाजातील दानदात्यांकडून मायेच्या उबसह आर्थिक मदत मिळावी म्हणून ‘लोकमत’ने सतत पाठपुरावा केला. त्याचो फलीत असे मिळाले की, जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी लोकेश मोहबंशी यांनी ‘त्या’ अनाथ मुलीच्या १२ वीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी स्वत: घेतली. बाक्टी येथील स्रेहा दिनेश मेश्राम (१४) व विराज दिनेश मेश्राम (८) हे दोघे सप्टेंबर २०१६ मध्ये जन्मदात्यांपासून पोरके झाले. यासंबंधी सज्ञान होण्याआधीच आई-वडीलांची सावली हिरावलेल्या त्या अनाथ दोघा भावंडाचे वास्तवचित्र, मनाला वेदना देणारे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने २५ सप्टेंबरच्या अंकात प्रकाशित केले. ‘लोकमत’ च्या पाठपुराव्याने त्या भावंडाना मदतीचा ओघ सुरू झाला.जिल्हा परिषदेत कार्यरत उपशिक्षणाधिकारी मोहबंशी यांनी कामाच्या व्यापामुळे त्या अनाथ भावंडाची प्रत्यक्षात भेट घेतली नसली तरी, अधिनस्थ असलेल्या बाक्टी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांकडून त्या अनाथ मुलांविषयी पूर्णत: चौकशी करुन परिस्थितीची विचारणा केली. जिल्ह्यातील संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी सांभाळणारे उपशिक्षणाधिकारी मोहबंशी यांनी महिलांसाठी शिक्षणाची दार उघडे करुन त्यांच्यात आत्मसन्मान प्राप्त करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून स्रेहाच्या १२ वीपर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण खर्चासह जबाबदारी स्विकारीत असल्याचे जाहीर केले होते. नव्हे त्यांनी ‘वचन’ दिले होते. त्या वचनाची प्रत्यक्षात पूर्ती करुन आपला संकल्प पूर्ण करण्यासाठी मोहबंशी १८ जानेवारी रोजी बाक्टी गावात आले व स्रेहा ९ व्या वर्गात शिकत असलेल्या चान्ना (बाक्टी) येथील मिलिंद विद्यालयात गेले. त्यांनी प्राचार्य हेमंत राजगिरे यांच्याशी भेट घेवून स्रेहाच्या १२ वी पर्यंतच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी घेत चार वर्षात येणारा संपूर्ण खर्च रोख स्वरुपात भरपाई करणार असल्याचे सांगितले. तर याप्रसंगी उपस्थित प्राथमिक शिक्षक समितीचे शाखा कार्याध्यक्ष कैलास हांडगे, महेंद्र मोटघरे, प्रा. गिरीष बोरकर, जयेश भोवते, राजन बोरकर, सचिन राठोड, खुणे, पी.आर. बोरकर यांच्या उपस्थितीत स्रेहाची आस्थेने विचारपूस करुन अभ्यासात लक्ष दे-जिद्द, चिकाटी व ध्येय समोर ठेवून कोणतेही दडपण न ठेवता पुढे जा असा मार्मिक उपदेश करुन पालकात्वाची उब देत रोख पुरस्कार देवून त्यांनी माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले. ‘लोकमत’च्या बातमीने मदतीची दारे उघडली अनाथ झालेल्या त्या अनाथ भावंडाची व्यथा ‘लोकमत’ने प्रकाशित करताच अनेकांनी मदतीसाठी सदर प्रतिनिधीशी संपर्क साधला. गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर यांनी सर्वप्रथम पुढाकार घेऊन डॉ. घनशाम तुरकर, डॉ. माधुरी नासरे, शिव नागपुरे, यशोदा सोनवाने, इत्यादींच्या सहकार्याने रोख १५ हजार रूपयांची मदत केली. बेदरकर यांनी तांदूळ, गहू, दाळ, दोघांना कपडे सुद्धा भेट देवून त्यांना मायेची कमतरता भासू दिली नाही. जि.प. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) उल्हास नरड यांनी सौभाग्यवती शुभांगी नरड यांना बाक्टी येथे त्या अनाथ भावंडाकडे पाठवून ऐन दिपावलीच्या उत्साहात त्यांच्यात नवी प्रकाशाची लाट निर्माण करुन रोख मदत देवून सांत्वन केले होते. आजही बेदरकर प्रतिनिधी मार्फत दोघांची हालचाल विचारीत असून तांदळाची मदत करीत आहेत. विराज हा इयत्ता ३ रीमध्ये आहे. त्याच्या ७ वीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मीना लिचडे, कैलास हांडगे, छाया मदने, मोटघरे या शिक्षकांनी उचलली आहे. त्या अनाथांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी सामाजिक दान दात्यांनी पुढे यावे असे आवाहन समाजातून केले जात आहे.