शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

२० नायब तहसीलदारांची पदावनती

By admin | Updated: April 1, 2015 00:49 IST

सेवाज्येष्ठता यादीला डावलून वर्षभरापूर्वी करण्यात आलेली २० नायब तहसीलदारांची पदोन्नती अखेर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशान्वये

गोंदिया : सेवाज्येष्ठता यादीला डावलून वर्षभरापूर्वी करण्यात आलेली २० नायब तहसीलदारांची पदोन्नती अखेर महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या आदेशान्वये विभागीय आयुक्तांनी रद्द केली आहे. त्यामुळे ते सर्व नायब तहसीलदार पुन्हा अव्वल कारकून झाले आहेत. हे नायब तहसीलदार जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत होते. त्यांना तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार, नागपूर विभागीय कार्यालयाने ११ जून २०१२ आणि १६ जुलै २०१३ रोजीच्या पत्रान्वये विभागातील अव्वल कारकून संवर्गाची संयुक्त ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केली होती. मात्र त्याला डावलून विभागीय आयुक्त कार्यालयाने गोंदिया जिल्ह्यातील १२, चंद्रपूर जिल्ह्यातील ६ तर भंडारा व नागपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एका अव्वल कारकुनांना ४ जानेवारी २०१४ रोजी पदोन्नती देऊन नायब तहसीलदार म्हणून गोंदिया जिल्ह्यात नियुक्ती देण्यात आली होती. मात्र या निवडसूचीने व्यथित होऊन गोंदियातील अव्वल कारकून राजेश्री मल्लेवार यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण नागपूर यांच्याकी.डे या निवडसुचिला आव्हान दिले होते.शासनाच्या वतीने या प्रकरणात महसूल व वनविभागाचे उपसचिव राजेंद्र बेंगळे यांनी शपथपत्र दाखल केले. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण (मॅट) नागपूर यांनी मूळ अर्जानुसार आदेश पारित केले. त्या आदेशान्वये दि.१ जानेवारी २०१२ ची सुधारित ज्येष्ठता सूची करण्याच्या संबंधाने शासन परिपत्रक दि.३१ जानेवारी २०१४ व मॅटने दिलेल्या निर्देशानुसार अव्वल कारकून व मंडळ अधिकारी संवर्गाची दि.१ जानेवारी २०१२ ची सुधारित अंतिम जेष्ठता सूची जिल्हाधिकाऱ्यांच्या स्तरावर तयार करण्यात आली. सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या १ जानेवारी २०१२ च्या सुधारित अंतिम ज्येष्ठता सूचीवरून नागपूर विभागाची सुधारित संयुक्त ज्येष्ठता सूचीची सरमिसळ करून संयुक्त ज्येष्ठता सूची तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. मॅटने दि.१ जानेवारी २०११ ची अव्वल कारकून व मंडळ अधिकारी यांची ज्येष्ठता यादी दुरूस्त करून त्या ज्येष्ठता यादीनुसार ज्या चुकीच्या अव्वल कारकुनांना पदोन्नती दिलेली आहे ती रद्द करून नव्याने पदोन्नती देण्याबाबतचे आदेश २६ मार्च २०१५ रोजी दिले. त्याअनुषंगाने गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयाने २७ मार्चला त्या सर्व नायब तहसीलदारांना त्वरित त्यांच्या मूळ जागी (अव्वल कारकून) रूज होण्यासाठी कार्यमुक्त केले. (जिल्हा प्रतिनिधी)